नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने कामगारांना पेन्शन देण्याची घोषणा केली आहे. असंघटित कामगारांसाठी देखील मोदी सरकारने ही मोठी घोषणा केली आहे. २१ हजार रुपये पगार असणाऱ्या असंघटित कामगारांना मासिक ३ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. तर १० कोटी कामगारांना याचा लाभ मिळणार असल्याचेही गोयल म्हणाले आहेत.
FM Piyush Goyal: A pension scheme is being launched called Pradhan Mantri Shram Yogi Mandhan, to provide assured monthly pension of 3000 rupees per month, with the contribution of 100 rupees per month, for workers in unorganized sector after 60 years of age https://t.co/qFNr9BKHxR
— ANI (@ANI) February 1, 2019
तसेच १०० रुपये प्रमाणे प्रतिमहिन्याच्या गुंतवणुकीवर ६० वर्षांच्या वयानंतर ३ हजार रुपयांची पेन्शन मिळणार आहे. मात्र १८व्या वर्षांपासून गुंतवणुकीला सुरुवात केल्यास दरमहा ५५ रुपयेच गुंतवावे लागणार आहेत. याजनेचा फायदा वयोवृद्ध पेन्शनधारकांना मिळणार आहे. लोकसभेमध्ये अंतरिम बजेट सादर करताना गोयल यांनी कामगारांसाठीची ग्रॅच्युईटीची मर्यादा वाढविण्याची देखील घोषणा केली आहे. आता जास्तीत जास्त २० लाख रुपयांची ग्रॅच्युईटी दिली जाणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.