नवी दिल्ली | संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज (३१ जानेवारी) सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. राष्ट्रपतींनी संसदेच्या दोन्ही सभागृहाना संबोधित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४मध्ये लोकसभा निवडणुका जिंकल्यानंतर गेल्या पाच वर्षात देशातील जनतेचा विश्वास संपादन करून ‘नवीन इंडिया’चा निर्माण केला असून देशाला अनिश्चितेतून बाहेर काढले आहे.
President Ram Nath Kovind: The country was going through a phase of uncertainty before the election (2014). After the election, my govt took up the initiative to form a 'New India.' https://t.co/Pi0vdY7NWm
— ANI (@ANI) January 31, 2019
तुम्हा सर्वांना माहिती आहे की, “गरीब जनतेचे आरोग्या उपचारावर खूप पैसे खर्च होतात आणि गरीबांना ऐवढे पैसे खर्च करणे शक्य नसते. त्यामुळे माझ्या सरकारने ही गोष्ट लक्ष्यात ठेवून सर्व गरीबांसाठी ‘आयुष्यमान भारत योजा’ सुरू केली आहे. या योजने अंतर्गत गेल्या ४ महिन्यात १० लाख गरीब लोकांना यांचा लाभ मिळाला आहे.”
President Ram Nath Kovind: We know that expenses on health makes a poor even poorer. My govt understood this & started Ayushman Bharat Yojana. In last 4 months more than 10 Lakh poor people availed health benefits in hospitals under this scheme. pic.twitter.com/IJVqFnRE0j
— ANI (@ANI) January 31, 2019
“माझ्या सरकारचे आरोग्य हेच महत्त्वाचे ध्येय आहे. मला तुम्हाला सांगाताना आनंद होत आहे की, ही योजना तळागाळातील गरीब लोकांपर्यंत ही योजना पोहचली आहे. “
President Ram Nath Kovind: Healthcare is my government’s topmost priority. I am happy to inform you that the benefits of government’s schemes are reaching poorest of the poor. pic.twitter.com/N6LvFsNlq4
— ANI (@ANI) January 31, 2019
जन धन योजने अंतर्गत देशातील तब्बल ३४ करोड लोकांचे बँकेत खाते उघडण्यात आले आहे. जवळपास देशातील प्रत्येक नागरिकांनी बँकेत खाते उघडले आहे. देशात २०१४-१७ या कालावधीत देशात ५५ टक्के लोकांनी बँक खाते उडले होते. तसेच भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याचा सरकारने पण केला आहे. मोदी सरकारने नोटाबंदीचा महत्त्वाचा निर्णय घेतल्याने जनतेचा सरकारवरचा विश्वास वाढल्याचेही राष्ट्रपती म्हणाले.
President Kovind: Under Jan Dhan Yojana, 34 crore people have opened a bank account & almost every family in the country is connected to the banking system. According to an international agency, 55% of the total bank accounts opened between 2014-2017 were opened in India itself. pic.twitter.com/Zdp3fcRIBH
— ANI (@ANI) January 31, 2019
यावर्षी महात्मा गांधीजींची १५० वी जयंती आपण साजरी करत आहोत. आपला देश महात्मा गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर पुढे चालला असल्याचे प्रतिपादन कोविंद यांनी केले. सरकारकडून ९ लाख कोटी शौचालयांची निर्मिती झाली आहे. सरकारकडून ६ कोटी लोकांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे.
अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्यास आरोपीला फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सोबतच तिहेरी तलाकचा निर्णय घेत मुस्लिम भगिनींना दिलासा दिला असल्याचे देखील राष्ट्रपती यांनी म्हटले आहे. सरकारने एक कोटी युवकांना कौशल विकासाचे प्रशिक्षण दिले आहे. युवकांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून मोठ्या प्रमाणात कर्ज दिले आहे. या योजनेचा लाभ ४ कोटीपेक्षा अधिक युवकांनी घेतला आहे. भारताचे नाव स्टार्ट अप मध्ये आघाडीवर आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.