HW News Marathi
देश / विदेश

जगातील १०० टॉप ब्रॅण्ड्समध्ये टाटा समूह ठरला एकमेव भारतीय ब्रँड

मुंबई | जगातील पहिल्या १०० ब्रॅण्ड्समध्ये एकमेव भारतीय ब्रँड ठरण्याचा मान टाटा उद्योग समूहाला मिळाला आहे. देशासाठी ही निश्चितच अत्यंत अभिमानाची बाब आहे. इंग्लंडच्या ब्रँड फायनान्स या सल्लागार संस्थेकडून निवडण्यात आलेल्या २०१९ मधील जगातील टॉप ५०० ब्रॅंड्समध्ये टाटा समुहाला ८६ वे स्थान देण्यात आले आहे. टाटा समुहापाठोपाठ एलआयसी २७७, इन्फोसिस ३१५, एसबीआय ३४४ तर रिलायन्स ४५० वे स्थान देण्यात आले आहे.

“जगातील टॉप १०० ब्रॅण्ड्समध्ये देशाची एकमेव कंपनी बनणे टाटा समुहाला भविष्यात सामाजिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मदत करेल. लोकांना चांगली उत्पादने देण्याचा प्रयत्न राहील,” अशी प्रतिक्रिया टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी टाटा समूह १०४ व्या क्रमांकावर होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत २०१९ सालात टाटा समूहाच्या मुल्यामध्ये ३७.४ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती ब्रँड फायनान्सचे कार्यकारी अधिकारी डेव्हिड हेग यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभेतील खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Aprna

“शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला की पळे”, मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांना टोला  

News Desk

भारत जोडो यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात संजय राऊत सहभागी; राहुल गांधी पहिल्यांदा जॅकेटमध्ये

Aprna