मुंबई | बॉलिवूडची अभिनेत्री ईशा कोप्पीकर हिने जाहीरपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ईशाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ईशाकडे भाजप देशपातळीवरील मोठी जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ईशा कोप्पीकरने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये काही हिट चित्रपट दिले आहेत.
Mumbai: Actor Isha Koppikar joins Bharatiya Janata Party (BJP) in the presence of Union Transport Minister Nitin Gadkari. #Maharashtra pic.twitter.com/XLETYOcppT
— ANI (@ANI) January 27, 2019
ईशाच्या भाजप प्रवेशावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तिचे पुष्पगुच्छ देवून ईशाचे भाजपमध्ये स्वागत केले. ईशाने आतापर्यंत अनेक हिंदी, मराठी, तामिळ, तेलुगू, कन्नड भाषी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘क्या कूल है हम, ‘डॉन’, ‘एक विवाह ऐसा भी’, ‘राईट या राँग’,’मैंने प्यार क्यों किया’, ‘डरना जरुरी है’, ’, यासारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये ईशाने अभिनय केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.