नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२७ जानेवारी) ५२ व्या ‘मन की बात’ मधून जनतेशी संवाद साधला. या वर्षी लोकसभा निवडणूक होणार असून २१व्या शतकात जन्मलेले तरुण पहिल्यांदाच या निवडणुकीत मतदान करणार आहेत. आता ती वेळ आली की, त्यांनी पुढे येवून आपल्या देशाच्या निर्णायक प्रक्रियेचा भाग होवून, मतदान करून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे, अशी शब्दात मोदींनी मन की मात मधूनतरुणी पिढीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताची वेगाने प्रगती सुरू आहे. अंतराळ योजनांमुळे तरुण शास्त्रज्ञांनी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. २४ जानेवारीला विद्यार्थ्यांनी तयार केलेला उपग्रह ‘कलाम सॅट’ अंतराळात झेपावला. तसेच अंतराळ मोहीमेतून भारत चंद्रावर लवकरच आपली मोहोर उमटवेल, असे देखील मोदी म्हटले आहे.
PM Narendra Modi in #MannKiBaat: Today, our space programme is powered by several young scientists. We must take pride in the fact that the satellites developed by our students are reaching the space today. On 24 January Kalam SAT, created by our students, was launched. pic.twitter.com/EjKTvp2Vht
— ANI (@ANI) January 27, 2019
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाच्या स्वतंत्र लढाईतील योगदान भारत कधीच विसरणार नाही. “चलो दिल्ली” आणि “तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूंगा” नेताजी यांनी दिलेल्या घोषणा संपूर्ण देशातील जनतेला माहितीच आहेत. परंतु नेताजींच्या या फाईल्स सार्वजनिक करण्याची मागणी गेली अनेक वर्षापासून होत होती. आणि आम्ही जनतेची ही मागणी पूर्ण केल्याचा आम्हाला आनंद होत आहे.
PM Narendra Modi in #MannKiBaat: For many years it was being demanded that the files related to Netaji be made public and I am happy that we fulfilled this demand. https://t.co/ib7p4zb71k
— ANI (@ANI) January 27, 2019
कर्नाटकमधील सिद्धगंगा मठाचे मठाधीश श्री. शिवकुमार स्वामी यांचे सोमवारी (२१ जानेवारी) यांच महिन्यात निधन झाले. मन की बातमधून स्वामी यांच्या वयाची १११ वर्षे शैक्षिणक आणि सामाजिक कार्यात अमुल्य अशा योगदानांची आठवण देखील करून दिली.
PM Modi in #MannKiBaat: We received a sad piece of news this month. Shivakumara Swami ji left us for his heavenly abode. He dedicated his entire life for the service of society. He spent the 111 years of his life working for the social, educational welfare of thousands of people. pic.twitter.com/kNOLOTVfEk
— ANI (@ANI) January 27, 2019
पुण्यात झालेल्या ‘खेलो इंडिया’ क्रीडा स्पर्धांचा मन की बातमध्ये उल्लेख मोदींनी केला आहे. पुण्यातील ‘खेलो इंडिया’ क्रीडा स्पर्धांमध्ये ६ हजार खेळाडूंनी भाग घेतला. यावेळी या स्पर्धांमध्ये प्रत्येक राज्याने आपआपल्या पातळीवर उत्तम प्रदर्शन केले, असे मोदी म्हणाले. पुण्यातील एका सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाचा मुलगा आकाश गोरखा याने ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये रौप्य पदक जिंकले. त्याच्या या कामगिरीचे मोदींनी कौतुक केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.