HW News Marathi
महाराष्ट्र

यवतमाळमधील धक्कादायक घटना! खड्ड्यांनी घेतला बाळ-बाळंतिणीचा बळी

मुंबई | पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या महिलेला प्रसुतीकळा सुरू झाल्या होत्या. गावात पुरेशा सोई उपलब्ध नव्हत्या. त्या गरोदर महिलेना ऑटोरिक्षातून रुग्णालयाच्या दिशेने निघाले. पण, रुग्णालयाच्या रस्त्यात खड्डे असल्यामुळे महिलेला त्रास वाढला. रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच तिची प्रसूती झाली. वेळेत उपचार न मिळाल्याने बाळ आणि बाळंतिणीचा वाटेतच जीव गेला. उमरखेड तालुक्यातील टोकावरच्या ढाणकी-बिटरगाव रस्त्यावर रविवारी (१० एप्रिल) ही धक्कादायक घटना घडली. 

या दुर्घटनेत रा. मन्याळी नताशा ढोके (वय ३०) बाळंतिणी त्यांच्या माहेरी मन्याळी बाळांतपणासाठी आले होते. मन्यमाळी हे दुर्गम भागावतील गाव असून याठिकाणी पुरेशा सुविधा नाहीत. बाळंतिणीला प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी रुग्णवाहिकेचा शोध घेतला. परंतु, त्यांना रुग्णवाहिका सापडली नाही. यानंतर बाळांतिणीच्या कुटुंबियांनी गावातील ऑटोमधून रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले. बिटरगाव-ढाणकी रस्त्याने जात जास्त खड्डे आहेत. यामुळे बाळांतिणीला रुग्णालय दोन किलोमीटरवर असतानाच ऑटो रिक्षात त्यांना प्रसूती झाली. आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे बाल आणि बाळंतिणी दोघांनी दगावले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘भाजपकडून राज्यभर आंदोलनाचा इशारा’!

News Desk

नुकसान भरपाई देऊ पण कोणाचेही जीव जाऊ देऊ नका- मुख्यमंत्री 

News Desk

पुण्यात पोलिसाचा पहिला कोरोना बळी,तर राज्यात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू

News Desk