HW News Marathi
मनोरंजन

ठाकरे सिनेमाचा स्पेशल स्क्रिनिंगलाच निर्माते व दिग्दर्शकांमध्ये रंगले मानआपमान नाट्य

मुंबई| शिवसेना आणि मनसे यांच्यातील पोस्टरबाजी सर्वांनाच माहिती आहे. मुद्दा कोणताही असो दोन्ही पक्षातील नेते पोस्टरच्या माध्यमातून एकमेकांना टोला लगावण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चित्रपटाच्या निमित्ताने मनसेने शिवसेनेला टोला लगावण्याची संधी आजही सोडली नाही. त्यामध्येच आज बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ठाकरे चित्रपटाचा प्रीमियर शो आयोजित केला होता.त्यात शिवसेना नेते व सिनेसृष्टीतील कलाकार उपस्थित होते त्यात दिग्दर्शन केलेले मनसे नेते अभिजित पानसे हे देखील उपस्थित होते. त्यावेळी दिग्दर्शक येण्या आधीच शो सुरू झाल्याने पानसे यांनी राऊत यांच्यावर नाराजी व्यक्त करत सिनेमागृहातुन पाय काढला.

चित्रपट आणि बाळासाहेबांची जयंती या दोन्हीचा योग साधून मनसेने सेनेला टोला लगावला आहे. मनसेने ठाकरे चित्रपटाला शुभेच्छा देणारे पोस्टर दादरमध्ये लावले होते त्यावरून आधीच नाराजी दिसत होती आणि त्यात हा प्रसंग म्हणजे वादावर ठिणगी पेटली आहे. ठाकरे सिनेमाचे दिगदर्शक अभिजित पानसे स्क्रिनिंग मधून निघून गेले .संजय राऊतांनी समजूत काढत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता पानसे कुटुंबासह सिनेमा न पाहत निघाले .

याबद्दल बोलताना राऊत म्हणाले की मीसुद्धा सिनेमाला उशीरा पोहोचलो आणि अभिजित पानसे यांना सुद्धा उशीर झाला त्यांना काम असल्याने ते निघून गेले असे म्हणत संजय राऊत यांनी या विषयावर बोलण्याच टाळलं मात्र ठाकरे सिनेमाच्या प्रमोशन मध्ये अभिजीत पानसे यांना डावल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना ऐतिहासिक यश !

News Desk

‘ग्लो आॅफ होप’च्या गीता उपळेकर यांचे वयाच्या 102 व्या वर्षी निधन

News Desk

थंडावा देणारा ताडगोळा

swarit