HW News Marathi
मनोरंजन

‘ग्लो आॅफ होप’च्या गीता उपळेकर यांचे वयाच्या 102 व्या वर्षी निधन

कोल्हापूर | म्हैसूरच्या जगनमोहन पॅलेसमधील जगप्रसिध्द असे ‘ग्लो ऑफ होप’ या चित्रासाठीच्या मॉडेल तथा चित्रकार असलेल्या दिवंगत एस. एल. हळदकणकर यांच्या कन्या गीता कृष्णकांत उपळेकर यांचे मंगळवारी सायंकाळी कोल्हापूर येथे निधन झाले. मृत्यू समयी त्या 102 वर्षांच्या होत्या. कोल्हापूर येथे त्यांनी मुलीच्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

म्हैसूरमधील पॅलेसमध्ये असलेल्या राजा रविवर्मा यांच्या चित्रांसोबत लावण्यात आलेले ग्लो ऑफ होप हे हातात दिवा घेतलेल्या तरुणीचे सुंदर चित्र राजा रविवर्मा यांनीच रेखाटल्याचा अनेकांचा समज होता. मात्र हे चित्र सावंतवाडी येथील चित्रकार एस.एल.हळदणकर यांनी काढले आहे. त्यांची पंधरा वर्षाची मुलगी गीता दिवाळीसाठी आईकरिता आणलेली साडी नेसून हळदणकर यांच्यासमोर आली आणि त्यांनी गीताला मॉडेल म्हणून उभे करून ग्लो ऑफ होप हे चित्र रेखाटले होते.

 

वेगवेगळ्या प्रदर्शनात हे चित्र लक्षवेधी ठरल्याने अनेक श्रीमंतांनी ते विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र आपल्याच मुलीचे चित्र विकण्यास हळदणकर यांनी नकार दिला होता. त्यामुळे हे चित्र म्हैसूरमधील पॅलेसमध्ये असलेल्या राजा रविवर्मा यांच्या चित्रांसोबत लावण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ठाकरे’ सिनेमाचा ट्रेलर लाँच

News Desk

युवांना ‘अग्निपंख’ देणारे डॉ. कलाम

News Desk

welcome2019 : नवीन वर्षात तरुणांनी केले मुंबई पोलिसांचे कौतुक

News Desk