HW News Marathi
राजकारण

करिना काँग्रेस तर माधुरी भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ?

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. यासाठी काँग्रेसने मोर्चे बांधणी करण्यास सुरू केली असून मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरला लोकसभेची उमेदवारी देण्याचा आग्रह काँग्रेसच्या नगरसेवकांनी धरला आहे. कारण भोपाळ लोकसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी करिना कपूरला उमेदवारी देण्याची पक्षाकडे मागणी केली आहे.

तरुण वर्गात करिनाची लोकप्रियता खूप आहे. तिच्या याच प्रसिद्धीचा प्रसिद्धचा फायदा काँग्रेसला होईल, असा विश्वास काँग्रेस नगरसेवक गुड्डू चौहान आणि अनीस खान यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. करिना ही सैफची पत्नी असून पतौडी घराण्याची सून असल्याचा फायदा होईल.

याआधी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित–नेनेला भाजपकडून पुण्यातून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. जून महिन्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा भाजपच्या ‘संपर्क फॉर समर्थन’ या मोहिमे अंतर्गत मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी माधुरीच्या घरी जावून तिची भेट घेतली होती. यानंतर माधुरी राजकारणात येणार असल्याच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. परंतु माधुरीच्या प्रवक्त्यांनी उमेदवारी ही निव्वळ अफवा असल्याचे म्हटले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई युथ कॉंग्रेसने केले मोदींना लक्ष

News Desk

काँग्रेसची सातवी यादी जाहीर, जालन्यातून विलास औताड यांना उमेदवारी

News Desk

काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून सूत्र हलवावीत हा त्यांचा डावपेच !

News Desk