HW News Marathi
देश / विदेश

इंधन दरवाढ, पेट्रोल १७ पैसे तर डिझेल १९ पैशांनी महागले

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत होती. परंतु दर कपातीनंतर आता पुन्हा इंधन दरात वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत आज (१९ जानेवारी) पेट्रोलसाठी ७६.३५ रुपये मोजावे लागतील. तर डिझेलचा दर ६८.२२ रुपयांवर गेला आहे.

दिल्लीकरांनाही इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर १७ पैशांनी तर डिझेलचे दर १९ पैशांनी वधारले आहेत. त्यामुळे आज दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलसाठी ७०.७२ रुपये आणि ६५.१६ रुपये मोजावे लागतील. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने घसरण होत होती.

१६ जानेवारी रोजी मुंबईत पेट्रोल फक्त ८ पैशांनी स्वस्त झाले होते. त्यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी ७५.९७ रुपये मोजावे लागले. परंतु डिझेलच्या दरात १३ पैशांची वाढ झाली होती. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर ६७.६२ रुपयांवर आला होता. तसेच दिल्लीतही इंधनाचे दर घटले होते. दिल्लीतही पेट्रोल ८ पैशांनी स्वस्त झाले. त्यामुळे एक लिटर पेट्रोलसाठी ७०.३३ रुपये मोजावे लागले तर डिझेलच्या दरात १२ पैशांची वाढ झाली होती. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर ६४.५९ रुपयांवर आला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केल्या ‘या’ १२ घोषणा

News Desk

सुरेश प्रभू यांचा राजीनामा

News Desk

जगातील १०० टॉप ब्रॅण्ड्समध्ये टाटा समूह ठरला एकमेव भारतीय ब्रँड

News Desk