HW News Marathi
देश / विदेश

दाभोळकर हत्या प्रकरण | दुसऱ्या राज्याच्या तपासावर अवलंबून का राहता ?

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाने डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाच्या तपासावरुन सीबीआयला चांगलेच खडसावले आहे. “तुम्ही या प्रकरणाच्या तपासासाठी दुसऱ्या राज्याच्या तपासावर अवलंबून का राहता ? या प्रकरणाचे गांभीर्य तुमच्या लक्षात येत नाही का ?”, असा सवाल उच्च न्यायालयाने सीबीआयला केला आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणी आरोपपत्र सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाने सीबीआयला ३ आठवड्यांचा अवधी दिला आहे.

दाभोळकर हत्या प्रकरणी सीबीआयकडून सचिन अंदुरे, शरद कळसकरला अटक करण्यात आली असली तरी अद्याप या दोघांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले नसल्याने उच्च न्यायालयाने सीबीआयला फटकारले. दाभोळकर हत्या प्रकरणात सीबीआयने तपासासाठी लावलेल्या विलंबावर आक्षेप घेत सचिन अंदुरे, शरद कळसकर यांच्या कुटुंबीयांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

‘तुम्ही गौरी लंकेश हत्या प्रकरणी कर्नाटककडून करण्यात येणाऱ्या तपासावर अवलंबून का राहता ? अशा प्रकारे दुसऱ्या राज्याच्या तपासावर अवलंबून राहणे लाजिरवाणे आहे. तुम्हाला या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येत नाही का ?’, असा सवाल उच्च न्यायालयाने सीबीआयला विचारला आहे.

‘गौरी लंकेश यांची हत्या नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येनंतर साधारण वर्षभरानंतर झाली. तरीही कर्नाटकमधील तपास यंत्रणांकडून गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाचा तपास जवळपास पूर्ण झाला असून आता खटलादेखील सुरू होईल. मग तुम्हाला अजूनपर्यंत आरोपपत्र दाखल करता का आले नाही ?’ असा सवाल करत न्यायालयाने सीबीआयच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“लोकांच्या मनातील पोलिसांची नकारात्मक प्रतिमा बदलणं हे मोठं आव्हान”- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Jui Jadhav

शांततेच्या मार्गाने चाललेल्या शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचे मोठे प्रयत्न, मात्र… !

News Desk

बाहेर फिरताना हटकल्याने मुजोर तरुणाने थेट पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर चढवली दुचाकी

News Desk