HW News Marathi
देश / विदेश

नोट नव्हे तर २० रुपयांचे नाणे येणार चलनात

नवी दिल्ली | काहीच दिवसांपूर्वी भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच २० रुपयांची नवी नोट चलनात आणण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळत होती. दरम्यान, आता २० रुपयांची नवी नोट असेल कि नाणे याबाबत चर्चा पूर्ण झाल्यानंतर २० रुपयांचे नवे नाणे चलनात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या २० रुपयांच्या या नव्या नाण्याचे डिझाईन देखील तयार असल्याची माहिती मिळत आहे.

२० रुपयांचे हे नवे नाणे अष्टकोनी आकाराचे असणार आहे. अंध व्यक्तीलाही ते नाणे सहजपणे ओळखता येईल, असे या नाण्याचे डिझाईन असणार असल्याची माहिती मिळत आहे. भारत सरकार से संलग्नीत शेप अँड साइज संस्था नाण्यांच्या डिझाईन निश्चित करते. आता येणाऱ्या नव्या नाण्यांवर सामाजिक संदेश देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

” केंद्रीय बँकेच्या अहवालात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. ३१ मार्च २०१६ पर्यंत २० रुपयांच्या नोटांची संख्या ४.९२ अरब इतकी होती. मार्च २०१८ पर्यंत ही संख्या १० अरबपर्यंत पोहोचली. देशातील एकूण चलनात २० रुपयांच्या नोटांची संख्या ९.८% इतकी आहे”, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने

दिली होती.

मोदी सरकारकडून ८ नोव्हेंबर २०१६ साली करण्यात आलेल्या नोटबंदीनंतर चलनातील अनेक नोटा पुन्हा नव्या रूपात चलनात आणल्या गेल्या आहेत. आतापर्यंत १०, ५०, १००,५००, २०००, २०० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या आहेत. या सर्व नोटा महात्मा गांधींच्या सीरिजमधल्या आहेत. यानंतर आता केंद्राने नवे नाणे आणणार आहे. याबाबत आज दिल्लीत बैठक देखील झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जीएसटीचा सर्वसामन्यांना भूर्दंड, ग्राहकांच्या खिशाला कात्री

News Desk

“माझ्यावर बलात्कार केला जाऊ शकतो” | दीपिका सिंह

News Desk

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात शशी थरुर यांना मोठा दिलासा…..

News Desk