HW News Marathi
राजकारण

#MarathaReservation : राज्य सरकारला आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी मुदतवाढ

मुंबई | राज्यभरात मराठा आरक्षण लागू करण्यात आल्यानंतर या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर आज (१४ जानेवारी) सुनावणी झाली असून न्यायालयाकडून राज्य सरकारला याबाबत आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी १८ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. २३ जानेवारीला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

मराठा समाजाला १६ टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरात मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायदा १ डिसेंबर २०१८ पासून लागू करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून ३ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले होते.

अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्यासह एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी देखील मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करण्यात यावे, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे. या पार्श्वभूमीवर आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारला १८ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राहुल लोणीकर

Manasi Devkar

बारामती जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पवारांच्या शुभेच्छा

News Desk

शिवसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील ६६ नगरसेवक शिंदे गटात सामील

Aprna