मुंबई | आठवड्याच्या सुरुवातीलाच आज (१४ जानेवारी) हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुर्ला-टिळकनगर रेल्वे स्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने सीएसएमटीकडे जाणारी लोकल ट्रेनची वाहतूक मंदावली आहे. यामुळे हार्बल रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. तर पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू आहे.. त्यामुळे प्रवशांचे हाल होत आहेत.
Central Railway: A keyman named Mukesh Kumar did a heroic work after noticing the crack in the track & promptly stopped the motorman of the Panvel up local towards CSMT, and it averted a big possible accident. Railway to reward that motorman accordingly. pic.twitter.com/SEc1OXinov
— ANI (@ANI) January 14, 2019
तसेच मुंबईत गेल्या सहा दिवसांपासून बेस्ट कर्माचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकर त्रस्त असताना आता रेल्वेच्या मार्गवर विस्कळीत झाले आहे. रेल्वे प्रशासनाकडून याची तातडीने दखल घेण्यात आली असून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रशासनाकडून लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.