HW News Marathi
देश / विदेश

लोकलचा प्रवास सुखकारक, दरवाजांवर ‘सेफ्टी’ सेन्सर

मुंबई | लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाइफलाइन म्हणून ओळखली जाते. मुंबईची लोकल ट्रेन आता लवकरच अपग्रेड होणार आहे. मुंबईत सातत्याने वाढणाऱ्या लोकसंख्यामुळे लोकलच्या वाहतुकीवर प्रचंड ताण येत असून यामुळे होणारे अपघातांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न रेल्वे मंत्रालयांनी केला आहे.

गर्दीच्या वेळी लोकल पकडण्यासाठी प्रवासी धावतात. लोकल धावत पकडण्यात त्यामुळे अनेक प्रवाशांचे अपघात झालेल आहेत. ही गोष्ट लक्ष्यात घेता रेल्वे मंत्रालयांनी लोकलच्या डब्ब्यांच्या दरवाजांवर ‘सेफ्टी’ सेन्सर लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेल्वे चालू होण्याचा सिग्नल प्रवाशांना मिळेल, आणि त्यामुळे प्रवाशी लोकल पकडण्याची घाई करणार नाहीत.

“लोकलच्या डब्बांवर निळ्या रंगाची लाईट म्हणजे सेफ्टी सेन्सर लावण्यात येणार आहे. ही लाईट प्रवाशांना ट्रेन सुरू होणार असल्याचे सिग्नल देणार आहे. यामुळे लोकलमध्ये चढताना होणाऱ्या अपघातांच्या प्रमाण कमी होईल,” असे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. रविवारी (१३ जानेवारी) त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आणि यामध्ये गोयल यांनी लोकल ट्रेनमध्ये सेफ्टी सेन्सरची माहिती दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

या ट्रेलरनंतर पिक्चर कधी रिलीज करायचा ते सैन्याचे नेतृत्व ठरवेल !

News Desk

तेजस ठाकरेंच्या संशोधनाची ‘आंतरराष्ट्रीय जर्नल’ने घेतली दखल

News Desk

अर्थमंत्र्यांसह मोदी सरकार खोटारडे | राहुल गांधी

Gauri Tilekar