HW News Marathi
महाराष्ट्र

९२ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग्रंथ दिंडीने सुरुवात

यवतमाळ | ९२ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग्रंथ दिंडीने आज (११ जानेवारी) सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्‍ते संमेलनाचे उद्घाटन होणार होते. परंतु त्यांना निमंत्रित करण्यात आल्याने काही संघटनांनी त्यांना विरोध दर्शवला. यानंतर संमेलनाच्या उद्घाटकाचा मान राजूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नी वैशाली सुधारक येडे यांना मिळाला आहे. संमेलनाच्या आयोजकांनी उद्घाटक म्हणून शेतकरी महिलेला मान देण्याची विनंती महामंडळाला केली होती. तर संमेलनाध्यक्षपदी डॉ. अरणा ढेरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

ग्रंथदिंडीमध्ये संत दर्शन देखावे, जन्मशताब्दी वर्ष असणारे पु.ल. देशपांडे, ग.दि. माडगूळकर यांच्या जीवन दर्शनावरील देखावे, लेंगीनृत्य, गोंडीनृत्य, कोलामीनृत्य अशा विविध लोक संस्कृतींचे दर्शन घडले. ग्रंथदिंडीत मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, स्वागताध्यक्ष मदन येरावार, कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांची उपस्‍थिती होती.

ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्‍ते करण्यात आले झाले. आझाद मैदान येथून निघालेली ग्रंथदिंडी पाच कंदील चौक, तहसील चौक, गोधनी रोड, राजन्ना बिल्डींग, अणे महिला महाविद्यालय, दत्त चौक, बस स्थानक चौक, गार्डन रोड, एल.आय.सी. चौक, पोस्टल ग्राऊंड या मार्गाने संमेलनस्थळी पोहचवण्यात आली.

नयनतारा सहगल यांच्या भाषणाच्या २००० प्रतींचे वाटप होणार

प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार नसल्या तरी त्यांच्या विचारांचा जागर होणार आहे. नयनतारा यांच्या भाषणातील मुद्दे परखड असल्याने त्यांचे आमंत्रण रद्द करण्यात आले. सहगल यांच्या भाषणाच्या २००० प्रतींचे उद्घाटन स्थळी वाटप करण्यात येणार आहे. यासाठी काही तरुणांनी पुढाकार घेतला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा क्रांती मोर्चा ९ ऑगस्टपासून पुन्हा रस्त्यावर उतरणार

News Desk

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी सोमय्या ईडी कार्यालयात!

News Desk

लॉकडाऊनमध्ये काळात राज्यात सायबरचे २२७ गुन्हे दाखल, महाराष्ट्र सायबर विभागाची माहिती

News Desk