HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला खराब हवामानाचा फटका, नियोजित पालघर दौरा रद्द!

मुंबई। खराब हवामानाचा फटका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला बसल्याचं दिसून येत आहे. कालपासून मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाने सुरुवात केली आहे. तसेच आज मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाावसाचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. आज मुख्यमंत्री पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनासाठी पालघर दौऱ्यावर होते. मात्र, हेलिकॉप्टर उड्डाणासाठी वातावरण अनुकूल नसल्याने मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे हे हेलिकॉप्टरने पालघरला दाखल होणार होते

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्धघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दुपारी 12.30 वाजता होणार होते. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हेलिकॉप्टरने पालघरला दाखल होणार होते. मात्र, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर उड्डाण करणं शक्य नसल्याने मुख्यमंत्र्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यांतील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता

त्यामुळे आता पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्धघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा निवासस्थानाहून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहेत. नियोजित वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता हा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे.भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, मुंबई, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांतील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अविनाश जाधवांना मलंगगडावर आरती करण्यापूर्वीच केली अटक, तरीही २७ एप्रिलला आरतीचा निर्धार

News Desk

शेतकऱ्यांनी ‘लाँगमार्च’ आंदोलन थांबवावे; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Aprna

काही प्रमुख मुद्यांवर लक्ष केंद्रीत केले तर १५ दिवसांत परिणाम दिसतील, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

News Desk