नवी दिल्ली । सवर्णांना देण्यात येणारे १० टक्के आरक्षण विधेयक आज (९ जानेवारी) राज्यसभेत मंजूर झाले आहे. हे देशातील १२४ वी घटनादुरुस्ती असलेले विधयक असून या विधेयकास राज्यसभेत १६५ मते विधेयकाच्या बाजुने मिळाली तर ७ मते विरोधात पडली आहेत.
Parliament passes bill granting 10% quota to economically-weaker sections of general category
Read @ANI Story | https://t.co/vbppt30ixq pic.twitter.com/Z02jRTbsWY
— ANI Digital (@ani_digital) January 9, 2019
हे विधेयक लोकसभेत मंगळवारी (८ जानेवारी) ३२३ विरुद्ध ३ अशा बुहमताने मंजूर झाले आहे. या विधेयकासाठी राज्यसभेच्या अधिवेशनाचा कालावधी एक दिवसांनी वाढविला होता.
काय आहे सवर्ण आरक्षण विधेयक?
देशातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात १० टक्के आरक्षणदेण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्राकडून सोमवारी (७ जानेवारी) घेण्यात आला आहे. या निर्णयाला केंद्र सरकारच्या कॅबिनेटकडून मंजुरी देण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.