HW News Marathi
व्हिडीओ

आधी ६ व्या वेतन आयोगाचे तर पैसे द्या

परळ येथील नौरोसजी वाडिया मॅटर्निटी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी आज(९ जानेवारी) धरणे आंदोलन केले आहे. लाल बावटा जनरल कामगार युनियन चे ३५० कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. सरकारने नूकताच ७ वा वेतन आयोग लागू केला आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना ६ व्या वेतनाच्या फरकाचीच रक्कम अजून मिळालेली नाही. राज्य शासनाकडून रुग्णालयातील कामगार व कर्मचाऱ्यांना ५० टक्के अनुदान दीले जाते मात्र २००६ पासुन हे अनुदान पुर्णपणे मिळालेलेच नाही. जवळपास ६७ कोटीं रुपये इतकी या अनुदानाची रक्कम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालुन अनुदान मिळवुन देण्याची मागणी या कामगारांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हातोला गावातील महिला जिल्हाधिकारी भावाला पाठवणार राखी, ओवाळणीतून करणार रस्त्याची मागणी

News Desk

“Shivsena, Balasaheb, उद्धवजी आणि कोकणाचं नातं हे केसारकरांना सात जन्मात कळणार नाही”; Vinayak Raut

Seema Adhe

आम्हाला त्या चोरीच्या पैश्याची गरज नाही; Nitesh Rane यांचा Sanjay Raut यांच्यावार पलटवार

News Desk