HW News Marathi
राजकारण

दिल्लीचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांचा राजीनामा

नवी दिल्ली |आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी करत असतानाच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीतील भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस महाआघाडीची तयारी करत आहे.

राजीनामा दिल्यानंतर माकन यांनी ट्विट करून काँग्रेस कार्यकर्त्यांचे आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे आभार मानले आहे. माकन यांनी म्हटले की, दिल्ली काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून गेली चार वर्षे मला सर्वांचे सहकार्य मिळाले. पक्ष अडचणीत असताना ही जबाबदारी सांभाळणे सोपे नव्हते, असे माकन म्हणाले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमचा शब्द पाळण्यासाठी तर भाजपचा शब्द जुमलेबाजीसाठी !

News Desk

माहुलच्या भयग्रस्त रहिवाश्यांची केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली भेट

News Desk

बीड पोलिसांकडून चंदन तस्करांविरोधात मोठी कारवाई; 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Aprna