HW News Marathi
देश / विदेश

सुप्रीम कोर्टात अयोध्या प्रकरणाची १० जानेवारीला सुनावणी

मुंबई | अयोध्याप्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र ही सुनावणी सुप्रीम कोर्टाने आता आणखी पुढे ढकलली आहे. या प्रकरणी नव्या पीठाचे गठन होणार असल्याने आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. ही सुनावणी १० जानेवारी रोजी होणार आहे.

१० जानेवारी रोजी नव्या पीठाचे गठन होणार असून त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचे आज न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. सध्या जे पीठ या प्रकरणाची सुनावणी घेत होते, त्यातील एक न्यायमूर्ती निवृत्त झाल्याने नव्या पीठाचे गठन करणे अत्यावश्यक आहे, यामुळेच या प्रकरणाची सुनावणी १० जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. केवळ १ मिनिटाच्या अवधीमध्ये सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे.सुप्रीम कोर्टाने नोव्हेंबरमध्ये या प्रकरणाशी संबंधित याचिकांवर लवकर सुनावणी घेण्यास नकार दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभेत काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट वाढविण्याचा प्रस्ताव पास

News Desk

1993 स्फोट; अबू सालेम,करिमुल्लाला जन्मठेप, दोन लाख दंड ; ताहिर, फिरोजला फाशी

News Desk

भाजप नेते वसीम बारी यांची अतिरेक्यांनी केली हत्या

News Desk