HW News Marathi
राजकारण

भाजपच्या खासदारांना व्हीप जारी

नवी दिल्ली | भाजपने २७ डिसेंबर रोजी लोकसभेत उपस्थित राहण्यासाठी पक्षाच्या खासदारांना तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे. २७ डिसेंबर रोजी (गुरुवारी) लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा होणार आहे. या चर्चेसाठी खासदारांनी सभागृहात उपस्थित राहावे म्हणून भाजपकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. मुस्लिम महिलांच्या अधिकारांचे रक्षण करणे हा या विधेयकाचा उद्देश आहे.

यापूर्वी देखील मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण २०१७(तीन तलाक) विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली होती. मात्र राज्यसभेत या विधेयकाला मंजुरी मिळू शकली नाही. त्यानंतर गेल्या आठवड्यात या विधेयकात सुधारणा करून ते पुन्हा लोकसभेत मांडण्यात आले होते. या विधेयकावर २७ डिसेंबर रोजी चर्चा होणार आहे. त्यासाठी भाजप खासदारांना सभागृहात उपस्थित रहावे लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Elections2019 : जाणून घ्या…कल्याण मतदारसंघाबाबत

Atul Chavan

कार्यकर्त्यांनी एक्झिट पोल, अफवांमुळे घाबरुन जाण्याचे काहीही कारण नाही !

News Desk

ठाकरे-आंबेडकरांमध्ये दीड तास बैठक; आगामी महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा ?

Aprna