HW News Marathi
मनोरंजन

FLASHBACK 2018 : मॅगसेसे पुरस्कारासाठी दोन भारतीयांची निवड

आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार मनिला येथील द रॅमन मॅगसेसे अॅवॉर्ड फाउंडेशन तर्फे दरवर्षी देण्यात येतो. फिलिपाईन्सचे राष्ट्रपती रॅमन मॅगसेसे यांचे १९५७ मध्ये एका विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर त्यांच्या नावाने पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. दर वर्षी ३१ ऑगस्ट रोजी राजधानी मनिलामध्ये हे पुरस्कार दिले जातात.

यंदाचा हा पुरस्कार भारतासाठी अत्यंत महत्वपुर्ण ठरला. आशियातील नोबेल पुरस्कार मानल्या जाणा-या ‘द रॅमन मॅगसेसे’ पुरस्काराची घोषणा करण्यात आल्यानंतर भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची घटना होती कारण यंदाच्या विजेत्यांमध्ये दोन भारतीयांचा समावेश होता. या आधी देखील अनेकदा भारतीयांना हा पुरस्कार मिळाला आहे. यंदाच्या पुरस्कारामध्ये मानसिक रुग्णांवर उपचार करणारे डॉ.भारत वटवानी आणि शिक्षण क्षेत्रात अनोखे काम करणारे सोनम वांगचुक या दोघांची या प्रतिष्ठीत पुरस्कारासाठी निवड करण्यात आली .

रस्त्यावर भीक मागणाऱ्या हजारो मानसिक रुग्णांवर उपचार करुन त्यांची काळजी घेणा-या आणि उपचारानंतर रुग्णांना त्यांच्या कुटुंबियांना भेटवणारे डॉ. भरत वटवानी यांना हा पुरस्कार दिला गेला. तर पर्यावरण, संस्कृती आणि शिक्षण यांच्या माध्यमातून मुलांच्या प्रगतीसाठी काम करणारे सोनम वांगचुक यांचा देखील यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मकरसंक्रांत स्पेशल तिळाचे गजक

News Desk

पंडित नेहरूंचे लहान मुलांसोबतचे काही निवडक क्षण

News Desk

प्रद्मावती सिनेमाच्या प्रदर्शनावर टांगती तलवार   

News Desk
राजकारण

एक घोट समाधानाचा

News Desk

मुंबई | लहानथोर सर्वजण नववर्षाच्या स्वागतासाठी जल्लोष करत असतात. मात्र शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस मात्र या दिवशी डोळ्यात तेल घालून खडा पहारा देत असतात. याची दखल घेऊन मुंबई आणि ठाणेयातील काही तरूण-तरूणी या कर्तव्यदक्ष पोलिसांना ३१ डिसेंबरच्या रात्री चहा-बिस्किटे देऊन त्यांच्या कामांचं कौतुक करण्याचा प्रयत्न करत असतात.

या गटाची सुरूवात एका अनोख्या उपक्रमाने झाली . ज्ञानेश्वरी वेलणकर या तरुणीने २०१५ रोजी या उपक्रमास सुरूवात केली.नववर्षाची पुर्वसंध्या अनोख्या पद्धतीने साजरी करण्याचे तिने ठरवले, यामध्ये आपल्यासोबत इतरांनाही आनंद मिळावा हा तिचा उद्देश होता . त्यातून तिने नववर्ष स्वागताच्या रात्री बंदोबस्ताला असणा-या पोलिसांना मदत करण्याचे ठरवले.

या उपक्रमांत रस असणा-या तरुणांचा व्हाॅट्सअप ग्रुप तयार झाला आणि दरवर्षी या उपक्रमामध्ये सहभागी होणा-या तरूणांची संख्या वाढत आहे. या उपक्रमासाठी यंदाही ही टीम सज्ज झाली आहे. ही टीम यंदाही गोरेगाव परिसरात पोलिसांनी चहा वाटपाचे काम करणार आहे.

Related posts

राज ठाकरेंना पुन्हा एक मोठा धक्का | राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांचा राजीनामा

News Desk

चंद्राबाबू नायडू आणि त्यांचे पुत्र नारा लोकेश नजरकैदेत, टीडीपी कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

News Desk

मोदींच्याच नेतृत्वातील एन डी ए सरकारला जनता पुन्हा संधी देणार | आठवले

News Desk