प्रयागराज | देशातील न्यायव्यवस्थेवर दबाव आणला जात असून याबाबत देशाला आणि तरुणांना सावध करण्याची वेळ आल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराजमध्ये कुंभच्या यशस्वी आयोजनाबद्दल गंगेच्या किनाऱ्यावर पूजा केली. यानंतर विविध विकासकामांचे उद्घाटन केले. यावेळी सभेला संबोधित करताना ते बोलत होते. प्रयागराजमध्ये सर्व भाविक अक्षयवट आणि सरस्वती स्तंभाचे दर्शन करू शकणार असल्याची घोषणा यावेळी पंतप्रधान मोदींनी केली.
यावेळी त्यांनी देशाला सावध करत असल्याचेही सांगितले. सर्वाधिक वेळ सत्तेत राहिलेला पक्ष आज देशाच्या स्वायत्त संस्थांना एका पक्षाच्या समोर हात जोडून उभे करण्याच्या प्रयत्नात आहे. हा पक्ष सर्व मर्यादा सोडून आहे. न्यायव्यवस्थेला सत्तेत राहून लटकवत ठेवतात आणि सत्ता गेली धमकावण्याचे काम करतात. केशवानंद प्रकरणात सर्वाच वरिष्ठ न्यायाधीशांना सरन्यायाधीश बनविण्यात आले नाही. न्यायाधीश खन्ना यांच्या ज्येष्ठतेकडे डोळेझाक करण्यात आल्याचा आरोपही मोदी यांनी केला.
PM Narendra Modi in Andawa, Prayagraj: Prayagraj is a place which can also be called 'the temple of justice' in Uttar Pradesh. In the recent times, the game of building pressure on the judiciary has started. In such a situation, it's essential to alert the nation&young generation pic.twitter.com/oTgHWqTiNx
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) December 16, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.