HW News Marathi
राजकारण

संभाजी भिडे यांचे मुंबईतील व्याख्यान रद्द करण्याची भीम आर्मीची मागणी

मुंबई | श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांची येत्या रविवारी(१४ डिसेंबर) लालबागमधील गणेश गल्लीतील गणेश मैदान येथे त्यांच्या संस्थेच्या वतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. परंतु या व्याख्यानाला भीम आर्मीने विरोध करत मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) यांना पत्र देऊन कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संभाजी भिडे यांची पार्श्वभूमी पाहता ते नेहमीच जातीवाचक भाष्य करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत असतात. तरुणांना जातीवर आधारित चुकीचा इतिहास सांगून त्यांना भडकविण्याचे काम करत असतात. तसेच ते आपल्या वादग्रस्त भाषणांनकरिताही प्रसिद्ध आहेत. वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या भीमा-कोरेगाव दंगलीमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे यंदाचा भीमा-कोरेगाव मानवंदना दिवस देखील जवळ येऊन ठेपला असताना भिडे यांची मुंबईसारख्या सुरक्षित आणि शांतता प्रिय शहरात सभा होणे हे शहराच्या एकात्मतेकरता फारच धोक्याचे आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

देशातील ही एकंदर वातावरण पाहता असुरक्षिततेची भावना सामान्य माणसाच्या मनात घर करून बसली आहे. अशा वातावरणात सदर व्यक्तीस येण्याची परवानगी देणे म्हणजे विस्तवाला हवा देण्यासारखे होईल. भिडे यांच्या येण्यामुळे आपल्या शहरात काही समाज कंटकांकडून कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ शकते अशी माहिती या पत्रातून देण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

औरंगाबादमध्ये शिवसेना नगरसेवकावर तरुणांकडून हल्ला

Gauri Tilekar

“मिटकरी हे लोकशाहीवादी विचाराचा नेता नाही”, महेश शिंदेंची धक्काबुक्कीनंतरची पहिली प्रतिक्रिया

Aprna

Shivsena Dasara Melava 2018 | २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार !

News Desk
राजकारण

संपूर्ण देशाला माहिती आहे कि देशाचा चौकीदार चोर आहे !

News Desk

नवी दिल्ली | राफेल करारात कोणतीही अनियमितता नाही, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी आज (१४ डिसेंबर) सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर भाजप नेत्यांकडून काँग्रेस आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. तरीही राहुल गांधी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून आले आहे. “राफेल विमान खरेदीत घोटाळा झाला आहे. संपूर्ण देशाला माहिती आहे कि देशाचा चौकीदार चोर आहे. आम्ही हे सिद्ध करूनच दाखवू कि देशाचे पंतप्रधान अनिल अंबानींचे मित्र आहेत आणि अनिल अंबानींमार्फत त्यांनी ही चोरी केली आहे”, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

राफेलबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. “नरेंद्र मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत ? केंद्र सरकारने ५२६ कोटींचे राफेल विमान १६०० कोटीला खरेदी का केले ? एचएएलकडून हे कंत्राट काढून घेऊन या क्षेत्रातील कोणताही अनुभव नसलेल्या अनिल अंबानींच्या रिलायन्सला हे कंत्राट का देण्यात आले ? असे अनेक प्रश्न राहुल गांधी यांनी यावेळी पुन्हा एकदा उपस्थित केले आहेत. त्याचप्रमाणे, “ज्या दिवशी राफेल कराराबाबत संसदीय समितीकडून चौकशी करण्यात येईल. त्या दिवशी दोन नावे पुढे येतील. ती म्हणजे नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी”, असा दावाही राहुल गांधी यांनी केला आहे.

राफेल विमान खरेदी प्रक्रियेत कोणतीही अनियमितता नाही, असे स्पष्ट करत केंद्र सरकार खरेदी करत असलेल्या १२६ विमान खरेदी प्रक्रियेत न्यायालय हस्तक्षेप करू शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. राफेल करारा संदर्भात प्रत्येक लहान लहान गोष्टींची पडताळणी करणे न्यायालयाला शक्य नाही, असेही सर्वोच्च न्यायालायने स्पष्ट केले आहे.

Related posts

मी स्वतः ‘झेडपी’च्या शाळेत शिकलो, शरद पवारांकडून शालेय आठवणींना उजाळा

News Desk

पालघर निवडणुकांमध्ये युतीला बहुमत, नगराध्यक्ष मात्र राष्ट्रवादीचा

News Desk

‘बोले तैसा चाले’ असे झाले नाही तर लोक झोडपून काढतात !

News Desk