HW News Marathi
राजकारण

पालघर निवडणुकांमध्ये युतीला बहुमत, नगराध्यक्ष मात्र राष्ट्रवादीचा

पालघर l पालघर नगरपरिषदेच्या १४ विभागांमधील एकूण २८ जागांचे निकाल सोमवारी (२५ मार्च) जाहीर करण्यात आले. या निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळाले असले तरीही पालघरच्या नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला काळे विराजमान होणार आहेत. कारण, नगराध्यक्ष हा जनतेतून निवडला जातो. त्यामुळे या निवडणुकांमध्ये जरी शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळाले असले तरीही जनतेचा कौल हा राष्ट्रवादीच्या उज्ज्वला काळे यांच्याच बाजूने लागला आहे.

पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतरची पालघर नगरपरिषदेची ही पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. दरम्यान, या निवडणुकांमध्ये एकूण २८ पैकी २१ जागांवर विजय मिळवत शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळाले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला २ आणि अपक्षांना ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. मात्र, जनतेने नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला काळे यांना पाठिंबा दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा बारामती दौरा रद्द

swarit

यशवंत सिन्हांची भाजपाला सोडचिठ्ठी

News Desk

उमेदवार यादीत स्मृती इराणींच्या नावापुढे धर्माचा उल्लेख, काँग्रेसने भाजपवर साधला निशाणा

News Desk