HW News Marathi
महाराष्ट्र

माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांचे निधन

मुंबई | राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांचे निधन झाले आहे. बोंगीरवार यांनी वयाच्या ७६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांचे ते सासरे होते. बोंगीरवार हे १९६६ बॅचचे आयएएस अधिकारी होते. त्यांनी सरकारच्या विविध खात्यांमध्ये आयएएस अधिकारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

तसेच बोंगीरवार यांनी महाराष्ट्रातील २५ वे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले होते. बोंगीरवार यांच्यामागे मुलगी दीप्ती, गार्गी आणि मुलगा पीयूष असे कुटुंब आहे. बोंगीरवार हे मूळचे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातले असून, त्यांनी उस्मानाबाद आणि नागपूर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी पदावरही काम केले होते. तसेच ते औरंगाबाद, पुणे आणि कोकणचे विभागीय आयुक्त होते.

महसूल खात्यामध्ये त्यांचा प्रदीर्घ अनुभव असून, बोंगीरवार कमिटीचे नेतृत्वही केले होते. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक आणि मनोहर जोशी या दोन मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. तसेच पुण्याचे महापालिका आयुक्तपद भूषवण्याचीही त्यांना संधी मिळाली होती. १९९९मध्ये त्यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘वर्षा’वर आज तासभर खलबतं ! उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बैठकीत नेमकं काय घडलं ?

News Desk

कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांचा मृत्यू

Aprna

राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होणार !

News Desk