हैदराबाद | चंद्रशेखर राव यांनी आज (१३ डिसेंबर) दुपारी तेलंगणाच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेलंगणामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीला(टीआरएस) घवघवीत यश मिळाले आहे. या यशानंतर चंद्रशेखर राव आंध्र प्रदेशमधून वेगळ्या झालेल्या तेलंगणा राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पद भूषविण्याचा मान पटकविला आहे.
Hyderabad: K Chandrasekhar Rao takes oath as the Chief Minister of Telangana pic.twitter.com/BseNTRQqMF
— ANI (@ANI) December 13, 2018
तेलंगणाचे राज्यपाल ई.एस.एल. नरसिम्हन यांनी चंद्रशेखर राव यांना गोपनियतेची शपथ दिली. तर मोहम्मद अली यांनाही उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. बुधवारी तेलगंणातील नवनिर्वाचि आमदारांनी केसीआर यांना आपला गटनेता म्हणून एकमताने निवडले होते. त्यानंतर, आज हा शपथविधी सोहळा पार पडला.
Hyderabad: K Chandrasekhar Rao after taking oath as the Chief Minister of Telangana pic.twitter.com/KhsKuUVHU9
— ANI (@ANI) December 13, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.