HW News Marathi
महाराष्ट्र

नागपूरातील गुणवंत पदकांना मुकणार

नागपूर | नागपुरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०६ वा दीक्षांत समारंभ हा विद्यार्थ्यांना काहीसा नाराज करणारा ठरणार आहे. दानदात्यांनी सुधारित रकमेचा धनादेश देण्यास नकार दिल्यामुळे, तब्बल दीडशे सुवर्ण व रौप्य पदके कमी करण्यात आली आहेत. त्यामुळे गतवर्षीपर्यंत ज्या अभ्यासक्रमांच्या गुणवंतांना सन्मानित करण्यात येत होते, ते यंदा त्याच अभ्यासक्रमांत मिळणा-या पदकांना मुकणार आहेत.

अभ्यासक्रमातील गुणवंतांना १०५ व्या दीक्षांत समारंभापर्यंत जवळपास ३४० पदके पारितोषिके प्रदान करण्यात येत होती. नागपूर विद्यापीठात काही दानदात्यांनी अगदी १९३० साली पुरस्कारासाठी निधी दिला होता. त्याकाळी मोठी वाटणारी अनामत रकमेची आताची किंमत फारच कमी आहे. त्या रकमेच्या आधारे दरवर्षी पदकांची निर्मिती करण्यासाठी विद्यापीठालाच निधी द्यावा लागत होता. त्यामुळे विद्यापीठाने दानदात्यांना पत्र लिहिले व आताच्या बाजारभावाच्या हिशेबाने सुधारित रकमेच्या धनादेशाची मागणी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

News Desk

“खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, ही चलाखी महाराष्ट्रात चालणार नाही – रोहित पवार

News Desk

दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार

News Desk
राजकारण

राज्य सरकारने एवढी घाई करून मेगा भरतीची जाहिरात का केली ?

News Desk

मुंबई | मराठा आरक्षणाचा कायदा १ डिसेंबर रोजी लागू झाला. त्यानंतर या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहे. मराठा आरक्षणाचे प्रकरण न्यायालयात असताना राज्य सरकारने एवढी घाई करून मेगा भरतीची जाहिरात का केली, असा सवाल उच्च न्यायालयाने केला आहे. मुख्य न्या. नरेश पाटील व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला हा सवाल केला आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी ३ डिसेंबर रोजी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या कायद्याला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

राज्य सेवा आयोगाने शासनाच्या विविध विभागांत एकूण ३४२ पदांच्या भरतीसाठी सोमवारी जाहिराती प्रसिद्ध केल्या असून सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्ग या नव्या प्रवर्गातूनही अर्ज मागविले असल्याची माहिती, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात दिली. दरम्यान, “हे अर्ज केवळ अंतिम परीक्षांसाठी मागविण्यात आले आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी अजून ६ महिन्यांचा अवधी जाईल”, असे ज्येष्ठ वकील व्ही. एम. थोरात यांनी सांगितले.

Related posts

मोठी बातमी! संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची युती

Manasi Devkar

कर्नाटक विधानसभा निवडणूकीत भाजपला झटका बसण्याची शक्यता

News Desk

फडणवीसांनी विरोधकांची ‘मळमळ’ काढली, नेमकं काय म्हणाले?

News Desk