HW News Marathi
राजकारण

राज्य सरकारने एवढी घाई करून मेगा भरतीची जाहिरात का केली ?

मुंबई | मराठा आरक्षणाचा कायदा १ डिसेंबर रोजी लागू झाला. त्यानंतर या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहे. मराठा आरक्षणाचे प्रकरण न्यायालयात असताना राज्य सरकारने एवढी घाई करून मेगा भरतीची जाहिरात का केली, असा सवाल उच्च न्यायालयाने केला आहे. मुख्य न्या. नरेश पाटील व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला हा सवाल केला आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी ३ डिसेंबर रोजी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या कायद्याला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

राज्य सेवा आयोगाने शासनाच्या विविध विभागांत एकूण ३४२ पदांच्या भरतीसाठी सोमवारी जाहिराती प्रसिद्ध केल्या असून सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्ग या नव्या प्रवर्गातूनही अर्ज मागविले असल्याची माहिती, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात दिली. दरम्यान, “हे अर्ज केवळ अंतिम परीक्षांसाठी मागविण्यात आले आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी अजून ६ महिन्यांचा अवधी जाईल”, असे ज्येष्ठ वकील व्ही. एम. थोरात यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही”, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा डिवचले

Aprna

मध्य प्रदेशमध्ये सत्ता आल्यानंतर संघावर बंदी घालण्याचे काँग्रेसचे आश्वासन

News Desk

राफेल प्रकरणी मोदींना क्लिन चिट देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

News Desk
देश / विदेश

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा शेअर बाजारावर परिणाम

News Desk

मुंबई | मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ,मिझोरामसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (११ डिसेंबर) सकाळपासून सुरुवात झाला आहे. तेलंगणात टीआरएस आणि राजस्थानमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली असून भाजप पिछाडीवर आहे. या राज्यांच्या निवडणुकीचा निकालाचा परिणाम शेअर बाजारावर मोठा पडलेले चित्र दिसून येत आहे. शेअर बाजारने सेंसेक्स ५००हून अधिकांनी घसरला आहे. दिवसाच्या सुरुवातीला डॉलरच्या तुलनेत रुपयाही घसरला आहे.

दरम्यान, आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी (१० डिसेंबर) शेअर बाजारात मोठी पडझड झाली होती. सोमवारी व्यवहारांना सुरुवात झाल्यावर मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील असलेल्या सेंसेक्समध्ये मोठी पडझड झाली आहे. भागधारकांनी विक्रीचा धडाका लावल्याने सेंसेक्स ६०९.५८ अंकांनी घसरला. तर निफ्टीमध्येही १८७ आंकांनी घसरण झाली होती.

Related posts

ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा

News Desk

व्यंकय्या नायडू यांचा राजीनामा, स्मृती इराणी यांच्याकडे पदाभार

News Desk

इस्रोच्या ‘गगनयान’ मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

News Desk