HW News Marathi
राजकारण

अहमदनगरमध्ये महानगरपालिकेच्या मतदान केंद्राबाहेर लाठीचार्ज

अहमदनगर | अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू असताना मत मोजणी केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला. पोलिसांच्या अंगावर रंग उधळल्यामुळे हा लाठीचार्ज सांगितल्याची सत्रांकडून माहिती मिळाली आहे.

मत मोजणी केंद्राबाहेर हजारो संख्येने लोकांचा समुदाय जमला होता. उमेदवार निवडून येताच कार्यकर्ते जल्लोष उद्देशाने जमा झाले होते. त्याचवेळी एका उमेदवाराच्या निवडीचा जल्लोष सुरू असताना काही पोलिसांच्या अंगावर रंग पडला. त्यामुळे पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला. लाठीचार्ज होताच जमावाने मिळेल त्या दिशेने पळ काढला. या लाठीचार्ज काहीजण जखमी झाले असून मत मोजणी केंद्राबाहेर चपलांचा खच पडल्याचे चित्र दिसून येते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘भीम आर्मी’च्या मुंबईतील कार्यक्रमाला परवानगी देण्यास पोलिसांचा नकार

News Desk

अप्रत्यक्षपणे मोदींच्या हातात काश्मीर

News Desk

नव्या संसद इमारतीत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी पंतप्रधानांना विनंती करणार! – मुख्यमंत्री

Aprna