HW News Marathi
क्रीडा

भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत १-०ने घेतली आघाडी

ऍडलेड | भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याच्या मालिकेत पाचव्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत १-०ने आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने या मालिकेत ३१ धावांनी विजय मिळवला आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का बसला होता. अखेर सामन्यात विक्रमी षटके टाकणाऱ्या अश्विनने जॉस हेजलवूडला बाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

चौथ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचे ४ फलंदाज माघारी धाडले होते. भारताने पाचव्या दिवसाची सुरुवात हेडची विकेट घेत केली. त्यानंतर अर्धशतकी खेळी करुन डोकेदुखी ठरत असलेल्या शॉन मार्शला बाद करुन कांगारुंना मोठा धक्का दिला. परंतु , कर्णधार पेनने कडवी झुंज देण्यास सुरुवात केली. त्याने कमिन्स बरोबर भागिदारी रचत भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. ४१ धावा करणाऱ्या पेनचा अडसर दूर करत ही जमू पाहणारी जोडी बुमराहने फोडली.

अखेर स्टार्कला बाद करत शमीने दिलासा दिला. त्यानंतर कमिन्सने आणि लायनने आठव्या विकेटसाठी भागिदारी रचण्याचा प्रयत्न सुरु केला. हा प्रयत्न कमिन्सला बाद करत बुमराहने हाणून पाडला. या दोघांनी नवव्या विकेटसाठी ३१ धावांची भागिदारी रचली. त्यानंतर लयानने चिवट फलंदाजी करत भारताला अखेरची विकेट मिळवण्यासाठी घाम गाळायला लावला. अखेर अश्विनने हजेलवूडला १३ धावांवर बाद करत या शंकेचे निरसन कले.

भारताकडून शमी, बुमराह आणि अश्विनने प्रत्येकी ३ बळी मिळवले. तर इशांतने १ बळी मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या तळातील फलंदाज लायन (३८), कमिन्स (२८), स्टार्क(२८) आणि लायनने (१३) यांनी २९१ धावांमधील १५० धावा करत भारताला चांगलाच घाम फोडला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Asian Games 2018 | आशियाई स्पर्धेत भारताला नेमबाजीत कांस्य पदक

swarit

विराट कोहलीचं वन डे कर्णधारपदही काढून घेणार ?

News Desk

आजपासून महिला हॉकी वर्ल्डकपला सुरुवात

News Desk
राजकारण

#MarathaReservation : आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज होणार सुनावणी

News Desk

मुंबई | मराठा समाजाच्या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेवर आज (१० डिसेंबर) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरकारने ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देणे हे घटनाबाह्य आहे, असे म्हणत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी ३ डिसेंबरला मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास तूर्तास नकार देत सोमवारी (१० डिसेंबर) अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेसह यासंदर्भातील अन्य याचिका देखील निकाली काढण्यात येतील, असे मुंबई उच्च न्यायालयाकडून ५ डिसेंबरला सांगण्यात आले होते.

या सर्व याचिकांवरील सुनावणी मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणार आहे. यावेळी अॅड. हरीश साळवे हे मराठा आरक्षणाची बाजू मांडतील. दरम्यान, राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठीची संवैधानिक आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली होऊन १ डिसेंबर २०१८ पासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायदा संपूर्ण राज्यभरात लागू करण्यात आला. परंतु कोणत्याही संस्था, संघटनेकडून न्यायालयात या आरक्षणाविरोधात आव्हान याचिका दाखल केली जाऊ शकते, ही शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने सोमवारी (३ डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले होते. त्यानंतरच, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Related posts

‘दुष्काळसदृश’ आणि सरकार ‘अदृश्य’ असा खेळ का मांडला जात आहे?

News Desk

उद्या आम्ही सत्तेत आल्यास पालेकरांना आमच्यावरही टीका करण्याचा अधिकार !

News Desk

छिंदम मारहाण प्रकरणी सेनेच्या नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल

News Desk