HW News Marathi
राजकारण

रिझर्व्ह बँकेच्या कामात केंद्राने हस्तक्षेप केलेला चालणार नाही !

नवी दिल्ली | “केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक आहे. तसेच सरकारने त्यांच्या राजकीय फायद्यासाठी कोणत्याही केंद्रीय बँकेच्या कामात हस्तक्षेप केला तर ते आम्हाला चालणार नाही”, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थशास्त्री मॅरिस ओब्स्टफील्ड यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँक आणि केंद्रीय अर्थ मंत्रालय यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या तणावावर मॅरिस ओब्स्टफील्ड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“मी कोणाचीही बाजू घेऊ इच्छित नाही. परंतु, आर्थिक स्थिरतेसाठी केंद्रीय बँकेने योग्य वेळीच योग्य निर्णय घायला हवेत. आर्थिक स्थिरतेसाठी रिझर्व्ह बँकेने घेतलेली भूमिका ही योग्य आहे. केंद्रीय बँक सक्षमरित्या देशाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणू शकते. त्यामुळेच सरकारने केंद्रीय बँकेच्या कामात हस्तक्षेप न करणे आणि तिला एखाद्या स्वायत्त संस्थेसारखे काम करू देणे हेच हिताचे ठरेल”, असेही यावेळी मॅरिस ओब्स्टफील्ड यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला मधाचे बोट लावण्याचा प्रयत्न”, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

Aprna

शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह कुणाचे यावर निवडणूक आयोगात होणार फैसला

Aprna

फक्त सत्ता आणि निवडणुकीचा विचार करण्यापेक्षा आधी दुष्काळाला पटकी द्या !

News Desk