HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

“अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला मधाचे बोट लावण्याचा प्रयत्न”, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

मुंबई | “अर्थसंकल्पातून मधाचे बोट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे”, अशी बोचरी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याज्या अर्थसंकल्पावर (Maharashtra Budget) केली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असलेला अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मांडला आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. “या अर्थसंकल्पातील बऱ्याच योजना आम्ही ज्या जाहीर केलेल्या होत्या. त्याचे थोडेसे नामांतर करून त्यांनी पुढे मांडलेल्या”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आज (9 मार्च) विधिमंडळाबाहेर प्रसार माध्यमांशी बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला बोल केला.

 

उद्धव ठाकरे म्हणाले, “आज सकाळी मी एक-दोन शेतकऱ्यांची बोललो. जो मधला अवकाळी पाऊस झाला. मी संभाजीनगरच्या शेतकऱ्याची बोललो. अद्याप सुद्धा त्यांच्या बांधावर पंचनामे करण्यासाठी एकही अधिकारी गेलेला नाही. एकूणच आजचा अर्थसंकल्प पाहिल्यानंतर सर्व समाजातील घटक मधाचे बोट लावण्याचा प्रयत्न झालेला आहे. भावनांशी खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे. अवकाळी पाऊस झाला तसा, मुंबईमध्ये गडगडा सुद्धा झाला. गडगडात झाला पण पाऊस काही पडला नाही. त्यामुळे हा जो काही अर्थसंकल्प आहे. जो गरजेल तो बरसेल काय अशा पद्धतीचा आहे. एका वाक्यात सांगायचे गाजर हलवा अर्थसंकल्प असे मी करेन. कारण यातून बऱ्याच योजना आम्ही ज्या जाहीर केलेल्या होत्या. त्याचे थोडेसे नामांतर करून त्यांनी पुढे मांडलेल्या. एक गोष्ट बरी आहे. जी योजना आम्ही मुंबई महापालिकेच्या मदतीने मुंबईत सुरू केली. ती म्हणजे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ती योजना आमची त्यांना फिता कापण्याचे भाग्य मिळाले. ती योजना आता राज्यभर राबविणार आहे. ज्या घोषणा झालेल्या आहेत त्या प्रत्यक्षात कधी येतील. हा ही एक प्रश्न आहे.”

 

“यापूर्वीचे दोन ते तीन अर्थसंकल्प  महाविकास आघाडीच्या सरकारने मांडले होते. अजित दादा जेव्हा उपमुख्यमंत्री बरोबर अर्थमंत्री पद सांभाळत होते. तेव्हाची परिस्थिती कशी होती, हे आपल्याला माहिती होते. कोरोनाचे संकट होते. आणि केंद्र सरकार हे काय आमच्या बाजूने नव्हते. प्रत्येक वेळेला कधी विचारले तरी साधारणतहा 25 हजार कोटीपेक्षा अधिक जीएसटीची थकबाकी  ही बाकी असायची. आमची अशी अपेक्षा होती. आता जवळपास सहा महिने झालेले आहे. महाशक्तिचा पाठिंबा असलेले हे सरकार राज्यात कारभार कसे करते. हे आपल्याला माहिती आहे,” असा टोलाही उद्धव ठाकरे शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.

‘गाजर हलवा’ अर्थसंकल्प

शेतकऱ्यासंदर्भातील घोषणाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “शेतकऱ्यांना त्यांनी सहा हजारापासून बारा हजार मदत करत आहेत. पण शेतकऱ्यांना हमखास भाव कसा मिळणार त्याबद्दल कुठेही वाचता नाही. अर्थसंकल्प वाचताना आमच्या विधानपरिषदेत दीपक केसरकरांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले. या अर्थसंकल्पात अनेकदा पंतप्रधानांचा उल्लेख केला. चांगली गोष्ट आहे. मला त्याबद्दल काही आक्षेप नाही. पंतप्रधान जेव्हा सत्तेत येत होते. तेव्हा शेतकऱ्यांची आमदनी किंवा उत्पन आहे. ते दुप्पट होईल, अशी घोषणा केली होती. आता 8-9 वर्ष झाली. त्याचाही कुठे काही पत्ता नाही. एकूणच परत एकदा सांगतो, हा अर्थसंकल्प गाजर हलवा अर्थसंकल्प आहे.”

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आजपासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात | आरोग्यमंत्री टोपे

News Desk

यापेक्षा सरकारशी काहीही संबंध ठेवायचा नाही…

swarit

देशाची आध्यात्मिक, सांस्कृतिक एकता अखंडित ठेवण्याचं काम अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराच्या माध्यमातून होईल! – अजित पवार

Aprna