HW News Marathi
महाराष्ट्र

धुळे-नगर महापालिका निवडणुकांचे निकाल आज

धुळे | धुळे आणि अहमदनगर महानगरपालिका निवडणुकांसाठी रविवारी (९ डिसेंबर) मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. धुळ्यामध्ये ६० टक्के तर अहमदनगरमध्ये ७०% मतदानाची नोंद झाली आहे. धुळे महानगरपालिकेच्या १९ प्रभागातील एकूण ७३ जागांसाठी तर अहमदनगर महानगरपालिकेच्या १७ प्रभागातील एकूण ६८ जागांसाठी मतदान घेण्यात आले.

धुळे आणि अहमदनगर या दोन्ही ठिकाणी आज (१० डिसेंबर) सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तर दुपारी १२ वाजल्यापासून या निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यान, शनिवारी (८ डिसेंबर) रात्री धुळे निवडणुकांच्या आदल्या दिवशी आमदार अनिल गोटे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. अनिल गोटे यांनी हा हल्ला भाजपच्या गुंडांकडूनच करण्यात आल्याचा आरोप केला असून त्यांनी पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

तरुणाईने जिल्ह्यात येणाऱ्या चांगल्या प्रकल्पांचे स्वागत करण्याची भूमिका घ्यावी! – पालकमंत्री उदय सामंत

Aprna

लोकसभा निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवणार

swarit

गावात जास्त घोळक्याने लोक आले तर गावकऱ्यांनी पोलिसांकडे माहिती द्यावी

swarit
संपादकीय

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील मैत्रीचा ओलावा आजही कायम

News Desk

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे राजकीय संघर्ष सर्वांनाच माहिती आहेत. या दोघांनी त्यांची मैत्रीही तितकीच जपली. शरद पवार यांना ‘बारामतीचा म्हमद्या’ किंवा ‘मैद्याचे पोते’ अशा शेलक्या शिव्या हे आपल्या खास स्टाईलने देताना बाळासाहेब ठाकरेंना उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. पण तरीही शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात कधीच कटूता आली नाही. त्यांचे संबंध नेहमीच मैत्रीपूर्ण आणि खेळीमेळीचेच राहीले. याचे नेमके कारण काय ? याचा महाराष्ट्राच्या जनतेने कधीच विचार केला नाही. कारण नातेसंबंधात राजकारण आणायचे नाही. ही पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा आहे. पण नातेसंबंधाना धरून राजकारण करायचे, अशी परंपराही याच महाराष्ट्रात आहे. त्यांच्या मैत्री संबंधातील काही निवडणक आठवणी.

एकत्र येऊन राजनीती नावाचे मासिक काढले

१९६६-६७ मधली गोष्ट आहे, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, भा. कृ. देसाई व शशिशेखर वेदक या चार तरुण मित्रांणी एकत्र येऊन एक मासिक काढण्याचा निर्णय घेतला. या सर्वांनी अमेरिकेतून प्रसिद्ध होणाऱ्या ‘टाइम’मासिकाच्या तोडीचे मराठी नवीन मासिक काढावे असे त्यांचे स्वप्न यांनी पाहिले होते. मराठीमधले हे साप्ताहिक अत्यंत प्रभावीपणे जनमानसावर छाप पाडेल आणि लोकांच्या मनात एक वेगळे स्थानही निर्माण करेल, असा त्यांना ठाम विश्वास होता. त्यांच्या मासिकाच नाव निश्‍चित झाले ‘राजनीती’! हे सर्वजण पुढच्या कामाला लागले. आमचा मासिकांचा पहिला अंक प्रकाशित झाला. काही कारणास्तव त्यांचे मासिक बंद पडले. मात्र पवार आणि ठाकरे यांच्यातील मैत्री संबंधात कधीच दुरावा आला नाही. उलट नेहमी गंमतीने म्हणतात, की माणसांनी एकत्र येऊन उद्योगाचा एक महान उपक्रम हाती घेतल्यावर त्याची ‘अखेर’ कशी होते, हेही आम्हा सगळ्यांना समजून चुकले!

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे नेमके नाते काय ?

दोघांचेही राजकीय विचार पाहता हे दोन्ही नेते कमालीच्या विरूद्ध दिशेला होते. मात्र, नातेसंबंधात राजकारण आणायचे नसते. परंतु, नातेसंबंधांना अनुसरून राजकारण कसे करायचे, हे दोघांनाही चांगलेच माहीत होते. कारण दोघेही एकमेकांचे जवळचे नातेवाईक. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया यांचा विवाह सदानंद सुळे यांच्याशी झाला. हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. पण सदानंद सुळे कोण आहेत, हे महाराष्ट्रातील खूपच कमी लोकांना माहीत आहे.

  • कोण आहेत सदानंद सुळे ?

सदानंद सुळे यांची ओळख केवळ सुप्रिया सुळे यांचे पती किंवा शरद पवार यांचे जावई लोकांना माहिती आहे. तर सदानंद सुळे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बहिणीचे पूत्र म्हणजेच बाळासाहेबांचे भाचे आहेत. त्यामुळे अर्थातच बाळासाहेब ठाकरे हे सदानंद सुळे यांचे सक्के मामा लागतात. सुळे हे अमेरीकेत नोकरी करत असताना, या काळात सुप्रिया आणि सदानंद यांची ओळख झाली. या ‘मधूर’ ओळखीची कुणकूण दोघांच्याही घरच्यांना लागली. त्यानंतर दस्तुरखुद्द बाळासाहेबांनीच पूढाकार घेतला आणि दोघांच्या लग्नाबाबत शरद पवारांना विचारणा केली. पवारांनीही मोठ्या आनंदाने मान्यता दिली. त्यामुळे दोघांच्या लग्नाचा बार उडाला

या लग्नामुळे महाराष्ट्रातील दोन्ही राजकीय घराणी एकमेकांच्या नात्यांत गुंतली गेली. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे दोघांचेही आपापले स्वतंत्र राजकीय पक्ष आहेत. पण, दोघांनीही राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याची गल्लत केली नाही. शरद पवारांनी आपल्या घरातूनच मिळालेला पुरोगामी विचारांचा वारसा कधी सोडला नाही. आणि कडव्या हिंदूत्त्ववादी बाळासाहेबांनी कोणत्याच मुद्दयावर शरद पवारांना पाठिंबा मागितला नाही. त्यामुळे या दोन्ही राजकीय नेत्यांचे संबंध हे नेहमीच राजकीय वादविवादाच्या पलिकडचे राहिले आहेत.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे कोलेशन एअर्स या इंग्रजी पुस्तकाचे

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या वेळेचा अनुभवही प्रणवदा यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिला आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मुंबईत आल्यावर मी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊ नये असे मत सोनिया गांधींचे होते. पण शरद पवारांनी बाळासाहेबांची भेट घेण्यासाठी मला आग्रह केला. मी जर बाळासाहेबांची भेट घेतली नसती तर बाळासाहेब नाराज झाले असते आणि मला शिवसेनेचा पाठिंबाही मिळाला नसता असंही मुखर्जी यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे.

  • सुप्रिया सुळेची बिनविरोध निवड

बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी घडलेली गोष्ट सांगितली. ‘सुप्रिया लहान असताना बाळासाहेबांच्या घरी खेळायला जायची. पुढे जेव्हा तिला राज्यसभेची उमेदवारी द्यायचे ठरले त्यावेळी बाळासाहेबांनी मला फोन केला. यावेळी त्यांची भूमिका विचारली. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले, आमची मुलगी निवडणूक लढवणार म्हणल्यावर माझी वेगळी भूमिका काय असणार. तुम्ही निश्चित रहा ती बिनविरोध निवडून येईल. यावेळी मी भाजपबद्दल विचारलं. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले होते की ‘तुम्ही कमळीची काळजी’ करु नका. सुप्रिया बिनविरोध निवडून येईल. आणि खरंच सुप्रिया बिनविरोध निवडून आली. पार्लमेंटमध्ये बिनविरोध निवडून येणं सोपं गोष्ठ नव्हती जी घडली.

Related posts

मुंबईत २६ जुलैची पुनारावृत्ती होऊ शकते ?

swarit

जिओ इन्स्टिट्यूटचा दर्जा एफटीआयआय (FTII) पेक्षा मोठा ?

swarit

शिक्षण खात्याला संविधानाचा विसर पडलाय का ?

swarit