HW News Marathi
राजकारण

विरोधकांना पराभूत करण्यासाठी तेलंगणात घुबडांचा वापर

नवी दिल्ली | तेलंगणात विधानसभा निवडणुकांसाठी येत्या ७ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, या निवडणुकांमध्ये विरोधकांना पराभूत करण्यासाठी तेलंगणामधील नेत्यांनी एका अत्यंत धक्कादायक मार्गाचा अवलंब केला आहे. तेलंगणाच्या सीमा भागात कलबुर्गी जिल्हातील सेदाम तालुक्यामधून घुबड तस्करी करणाऱ्या ६ जणांना पोलिसांकडून ताब्यात घेतले होते.

या तस्करी केलेल्या घुबडांचा वापर तेलंगणा विधानसभा निवडणुकीत जिंकण्यसाठी केला जात आहे. काळी जादू करून एखाद्या व्यक्तीला वश करण्यासाठी घुबडाचा वापर केला जातो. म्हणूनच, निवडणूक जिंकण्यासाठी सेदाम तालुक्यात तस्करांकडून या घुबडाचा वापर करण्यात येणार होता, अशी माहिती मिळत आहे. खरंतर, निवडणुकांमध्ये जिंकण्यासाठी नेते मोठ्या प्रमाणात प्रचार, जाहिराती करून लोकांना आकर्षि करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तेलंगणामधील नेत्यांनी अवलंबलेला हा मार्ग निश्चितच धक्कादायक आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खा.शरदचंद्रजी पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्त्यांचा जल्लोष.

News Desk

भुजबळांसाठी खुशखबर, आता राज्याबाहेर करू शकणार भ्रमंती

News Desk

मोदी सरकार सर्जिकल स्ट्राईकचे भांडवल करते !

News Desk