बिलासपूर | कोणी घर देत का घर… असा नटसम्राट या प्रसिद्ध मराठी नाटकातील हा डायलॉग तुम्ही ऐकला असेलच परंतु आता खऱ्या आयुष्यात देखील असे म्हणण्याची वेळ बिलासपूरमधील एका ६० वर्षीय महिलेवर आली आहे. या महिलेने आपले घर चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरांचे वाटप करण्यात आले. या योजनेसाठी महिलेने काही पैसे सुद्धा भरले होते. परंतु, अद्याप तिला घर भेटले नाही. त्यामुळे सध्या या महिलेला कच्च्या घरात राहावे लागत आहे.
Bilaspur, Chhattisgarh: 60-yr-old woman levels allegations on officials for not giving her the house allotted under PM Awas Yojana; says, “My house has been stolen. I've already given 2 installments. I was living in a mud hut that collapsed. I demand police investigation.”(02.12) pic.twitter.com/g5mzjcywB6
— ANI (@ANI) December 3, 2018
या महिलेने घरासाठी ८० हजार रुपयांचा हप्ता सुद्धा भरला आहे. तिला अद्याप घर भेटले नाही. यासंबंधीच्या अधिकाऱ्यांशी आमचे बोलणे झाले. परंतु त्यांनी यावर चर्चा करण्याचे टाळले. त्यामुळे आता याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आली आहे, असे या गावच्या सरपंचानी सांगितले. तर, तक्रारदार महिला म्हणाली की, सरकारी अधिकाऱ्यांनी माझे घर चोरी केले आहे. वाटप करण्यात आलेल्या घरांसाठी मी पैसे सुद्धा भरले आहेत. मात्र, मला अद्याप घर मिळाले नाही.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.