HW Marathi
महाराष्ट्र

Bhima Koregaon Case : नवलखांना अटक करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी

नवी दिल्ली | भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी संशयित आरोपी मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांना अटक करण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने शपथपत्र सादर केले असून गौतम नवलखा यांच्या अटकेची परवानगी देण्याची मागणी केली आहे. इतर आरोपींसह गौतम यांचा जवळून संबंध असल्याचे पुरावे हाती लागल्याचेही पोलिसांनी या शपथ पत्रात म्हटले आहे.

गौतम नवलखा यांच्यावर असलेले गुन्हे हे अत्यंत गंभीर स्वरुपाचे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश रद्द ठरवत अन्य आरोपींसह गौतम नवलखा यांना अटक करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पुणे पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने गौतम नवलखा यांना १ नोव्हेंबरपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले होते.

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी २८ ऑगस्ट रोजी गौतम नवलखा यांच्यासह पाच विचारवंताना पुणे पोलिसांनी अटक केली होती. मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्यासह नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप पुणे पोलिसांनी त्यांच्यावर लावला होता.

Related posts

लाड यांचा काँग्रेस नेत्यांवर ५०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा

News Desk

अहमदनगर हत्याकांडाची केस फासट्रॅक कोर्टात चालवा

News Desk

मुरूड आता जागतिक पर्यटन स्थळ

News Desk