लखनौ | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे दलित असल्याचे वादग्रस्त विधान केल्यानंतर या प्रकरणाची राजकारणात जोरदार चर्चा रंगलेली होती. हे प्रकरण शांत होत असतानाच आता अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय हनुमान यांच्या संदर्भात एक धक्कादायक विधान केले आहे. ‘हनुमान हे दलित नव्हते तर आदिवासी होते’ असल्याचे साय यांनी म्हटले आहे.
#WATCH: Nand Kumar Sai,National Commission of Scheduled Tribes chairperson,says,"Log ye samajhte hain ki Ram ke sena mein Bhaloo the, banar the, giddh the…Hamara janjaati samaaj alag alag hai,kanwar samaaj mein 'hanuman' gotra' alag se hai.Ram ke saath ladai me ye log gaye the' pic.twitter.com/nrIlug9dzg
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 30, 2018
अनुसूचित जातींमध्ये हनुमान हे एक गोत्र असते. कुडूक या अनुसूचित जातीमध्ये तिग्गा नावाचे गोत्र आहे. ज्याचा अर्थ वानर असा होतो. तसेच अनुसूचित जातींमध्ये हनुमान आणि गिधाड अशी देखील गोत्रे आहेत, असे साय यांनी म्हटले आहे. प्रभू श्रीरामाने ज्या दंडकारण्यात सैन्य गोळा केले. त्यामध्ये अनुसूचित जातींचे लोक होते. त्यामुळे हनुमान हे दलित नव्हे तर अनुसूचित जातीचे होते, असे नंदकुमार साय यांनी म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.