HW News Marathi
राजकारण

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना १५ लाखाची मदत दया !

मुंबई | वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या लोकांना जसे १५ लाखाची मदत दिली जाणार आहे तशीच मदत सरकारने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना व मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या ४२ जणांच्या कुटुंबियांना १५ लाखाची मदत दयावी अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.

मराठा विधेयक सभागृहात मंजुर करण्यात आले. त्याचे स्वागतही केले परंतु राज्याचे प्रमुख सभागृहात आहेत. याच सभागृहामध्ये राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शब्द दिला होता. अवनीच्या हल्ल्यात मृत झाले त्यांना १० ते १५ लाखाचे अर्थसाह्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जनावरांचा मृत्यू झाल्यास त्यांची भरपाई ६० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

काल जसा मराठा विधेयक मंजुर करण्यात आले. सकल मराठा समाजाने ५८ मोर्चे काढले. परंतु हे सगळं करत असताना ४२ जणांनी आपला जीव गमावला. जर वन्यप्राण्यांनी माणसाला मारले तर १५ लाख रुपये देता. तसे त्या ४२ जणांच्या कुटुंबांना प्रत्येकी १५ लाखाची मदत दया. मोर्चे काढल्यामुळे १५ हजार तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. ते गुन्हे मागे घ्यावे आणि विषय संपवून टाकावा. प्रत्येक जिल्हयात वसतीगृहाचा मुद्दा तात्काळ सोडवावा. विधेयकाचा प्रश्न संपला परंतु हे काही विषय आहेत त्याकडे सरकारने तात्काळ लक्ष दयावा अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

मराठा आंदोलनामध्ये ज्याच्या घरातील कर्ती व्यक्ती गेली त्याच्या घरातील एकाला नोकरी दयावी. सरकारला हे करणं कठिण नाही. यालाच अनुसरुन राज्यातील जे शेतकरी आत्महत्या करतात त्यांच्या कुटुंबाला सरकार फक्त एक लाख रुपये देते. खरंतर शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये, त्यांनी आत्महत्या करु नये म्हणून त्यांची कर्जमाफी असेल किंवा आधारभूत किंमत दीडपट असेल तिही दिली पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्राच्या धमन्यांमधील रक्त उसळणार आहे काय?

News Desk

एकनाथ शिंदेंनी आमदारांचे भावनिक पत्र केले ट्वीट

Aprna

कर्नाटकातील कुमारस्वामी सरकारच्या अग्निपरीक्षेला सुरुवात

News Desk
देश / विदेश

आता व्हॉट्सअॅपवर सुद्धा जाहिराती ?

News Desk

मुंबई | सोशल मीडियामधील मातब्बर असलेल्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची मालकी मार्क झुकेरबर्ग यांच्याकडेच आहे. व्हॉट्सअॅप या अत्यंत लोकप्रिय असलेल्या सोशल मीडिया अॅपमध्ये कोणत्याही प्रकारच्या जाहिरातींचा मारा नसल्याने युझर्समध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. पण आपल्याला असलेली ‘ॲड फ्री’ सूट लवकरच संपुष्टात येणार आहे. आता नवीन वर्षाच्या सुरवातीलाच व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये जाहिराती दिसणार आहेत.

व्हॉट्सअॅपमध्ये असणाऱ्या प्रायव्हसीमुळे कंपनीकडून स्टेटस फीचरमध्ये जाहिरात देण्यास सुरवात करणार आहे. अशा पद्धतीचे फिचर यापूर्वीच इन्स्टाग्राममध्ये आहे. व्हॉट्सअॅपच्या स्टेटस फिचरमध्ये जाहिरातींची सुरवात अँड्रॉईड आणि ISO वर एकाचवेळी सुरु होणार आहे. आपल्याला स्टेटस फिचरमध्ये जाहिरात पाहावीच लागणार आहे. युझर्सना त्या जाहिराती बंद करण्याचा कोणताही पर्याय असणार नाही.

प्रसिद्ध व्हॉट्सअॅप न्यूज पोर्टल WAbetainfo ने ट्विटरवर पोल केला होता. या पोलमध्ये आपण स्टेटसमध्ये जाहीरात फिचर दिल्यानंतर व्हॉट्सअॅपचा वापर करणार का ? असा प्रश्न विचारला होता. यावर ६० लोकांनी व्हॉट्सअॅप वापरणार, असे मत व्यक्त केले, तर ४० टक्के लोकांनी व्हॉट्सअॅप सोडून देणार असल्याचे सांगितले.

Related posts

“वाह रे मोदी तेरा खेल”; इंधन दरवाढीविरोधात युवा काँग्रेस आक्रमक

News Desk

अॅट्रॉसिटी कायद्या | आज दलित-आदिवासी संघटनांची ‘भारत बंद’ची हाक

News Desk

४०० वर्ष जुन्या वटवृक्षाला वाचवण्यासाठी पर्यावरण मंत्र्यांचे केंद्रीय परिवहन मंत्र्यांना पत्र

News Desk