नवी दिल्ली | भारतासोबत चांगले संबध प्रस्थापित करण्याचे असतील तर पाकिस्तानने धर्मनिरपेक्ष व्हावे, असा टोला भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी दिला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) १३५ दिक्षांत संचलन सोहळ्यानंतर रावत पत्रकारांशी बोलत होते. भारताने पाकिस्तानसोबत मैत्रीपुर्ण संबंध ठेवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले होते. परंतु पाकने स्वतःला इस्लाम राष्ट्र म्हणून घोषित केले आहे.
Army Chief General Bipin Rawat: Pakistan has made its state an Islamic State. If they have to stay together with India, then they've to develop as a secular state. We are a secular state. If they're willing to become secular like us, then they seem to have an opportunity pic.twitter.com/1Os8jBzfRh
— ANI (@ANI) November 30, 2018
जर्मनी आणि फ्रांससोबत राहू शकतात. तर भारत पाकिस्तान का नाही असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कर्तारपूर कॉरिडोरचे भूमीपूजनाच्या वेळी म्हणाले होते. याला प्रतिउत्तर देताना रावत म्हणाले की, भारताने पाकिस्तान सोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले आहे. पण त्यांच्याकडून कुठलेही पाऊल चालण्यात आले नाही. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद्याना आश्रय देण्याचे थांबवत नाही. दोन्ही देशात मित्रत्वाचे संबध प्रस्थापित होण्यासाठी भारताने अनेकदा पाऊले टाकले आहेत. पाकिस्तानने आतंकवाद्यावर कारवाई करून पाऊल उचलावे. त्यांनतर भारत नक्कीच विचार करेल असेही त्यांनी यावेळी रावल म्हटले.
Army Chief: They're (Pak) saying you take one step, we'll take 2. There is contraditcion in what they're saying. 1 step from there should come in a positive manner,we'll see if the step has effect on ground.Till then our nation has a clear policy- terror & talks can't go together pic.twitter.com/QzhbsNQQLu
— ANI (@ANI) November 30, 2018
तसेच सध्यस्थितीत लष्करात महिला कायमस्वरूपी अधिकारी पदावर घेण्यात येत नाही. अजूनही थेट युद्धभूमीत समावेश शक्य नाही. अजून लष्करात ग्रामीण भागातून येणाऱ्या जवानांची संख्या फार मोठी आहे. पुण्या मुंबईत राहणाऱ्या नागरिकांना सारखी मानसिकता नाही ही बदलणे गरजेचे. परंतु पुढील काळात महिलाना लष्करी कुटनीती, दुभाषी या सारख्या मोठ्या भूमिका बजावू शकतात या दृष्टीने विचार सुरू आहे. अशा प्रकारच्या संधी लवकरच महिला अधिकाऱ्यांना लष्करात दिली जाणार असल्याचे रावल यांनी बोलत होते.
Army Chief General Bipin Rawat:Seeing if women can be given Permanent Commission. In some fields where we need permanency&male officers in a command-oriented Army don't fit everywhere.Keeping women officers in fields like language interpreter,military diplomacy will be beneficial pic.twitter.com/FnSvWBdcrm
— ANI (@ANI) November 30, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.