नवी दिल्ली | पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांच्या हस्ते कर्तारपूर कॉरिडोरचे भूमीपूजन करण्यात आले. त्यावेळी बोलताना, इम्रान खान यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांबाबत विधान केले आहे. “जर एकमेकांशी अनेक युद्ध लढलेले फ्रान्स आणि जर्मनी शांततेत जगू शकतात तर भारत आणि पाकिस्तान का नाही ?”, असा सवाल इम्रान खान यांनी केला.
“मला कळत नाही कि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर एवढ्या प्रमाणात टीका का झाली ? ते तर केवळ शांततेबाबत बोलत आहेत. त्यांनी पाकिस्तानात निवडणूक लढवली तर ते जिंकतील. मला आशा आहे की मला सिद्धूला पंतप्रधानपदी पाहायला आणि दोन्ही राष्ट्रांची मैत्री व्हायला फार वेळ थांबावे लागणार नाही”, असेही यावेळी इम्रान खान म्हणाले. दरम्यान, इम्रान खान यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण तापायला सुरुवात झाली आहे.
#WATCH Pakistan PM Imran Khan: I don't know why was Sidhu criticised (in India). He was just talking about peace. He can come and contest election here in Pakistan, he'll win. I hope we don't have to wait for Sidhu to become Indian PM for everlasting friendship b/w our nations. pic.twitter.com/yPdWCJDYAr
— ANI (@ANI) November 28, 2018
“भारत आणि पाकिस्तान यांच्यात आता लढाई होणार नाही. कर्तारपूर कॉरिडोर खुला करणे म्हणजे मदीनाची सीमरेषा खुली करण्यासारखे आहे”, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी ‘हिंदू जीवे, पाकिस्तान जीवे अशी घोषणा’ यांनी केली होती. सर्वांनी विचार करण्याची पद्धत बदलली तरच शांतता प्रस्थापित होईल, असेही नवज्योतसिंग सिद्धू यांनी म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.