HW News Marathi
राजकारण

भाजप नाही, काँग्रेसच दलितविरोधी पक्ष !

जयपूर | भाजप दलितविरोधी नसून काँग्रेसच खरा दलितविरोधी पक्ष आहे असे सांगत राजस्थानातील दलितांनी भाजपला भरघोस मतदानाने विजयी करून काँग्रेसला पराभवाची धूळ चारावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जयपूर येथे केले. राजस्थान विधानसभा निवडणुक रिंगणात रिपब्लिकन पक्षाने 14 उमेदवार स्वबळावर उतरविले असून अन्य 186 जागांवर रिपब्लिकन पक्षाने भाजपला पाठिंबा दिला आहे.या बाबतची अधिकृत घोषणा येथे रिपब्लिकन पक्षाच्या बैठकीत ना रामदास आठवलेंनी केली. यावेळी रिपाइं च्या अधिकृत 14 उमेदवारांची यादी रामदास आठवलेंनी जाहीर केली. यावेळी रिपाइंचे राजस्थान चे प्रदेश अध्यक्ष राधामोहन सैनी हे उपस्थित होते.

काँग्रेसने मागील 60 वर्षांत केवळ घोषणाच केल्या. गरिबांचे प्रश्न काँग्रेस सोडविले नाहीत. दलितांना काँग्रेसने विविध आश्वासनांच्या भूलथापा मारून भूलथापांचा भुलभुलैया उभा केला. काँग्रेसने केवळ घोषणा केल्या मात्र महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची स्मारके भाजप ने पूर्ण केलीत. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याची वेळ जेव्ह जेंव्हा आली तेंव्हा तेंव्हा काँग्रेसने धोका दिला आहे. त्यामुळे काँग्रेस हा दलितविरोधी पक्ष असून राजस्थानातील दलितांनी काँग्रेस उमेदवारांना पराभूत करावे असे आवाहन रामदास आठवलेंनी यावेळी केले.

त्यामुळे काँग्रेसला राजस्थानात दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा येथील मतदारांनी पाळली असून त्यात यावेळेस बदल घडवा आणि मुख्यमंत्री वसुंधरा राजेंच्या नेतृत्वातील सरकारला पुन्हा बहुमताने निवडून देण्याचे आवाहन रामदास आठवलेंनी केले. राजस्थानात मुख्यमंत्री वसुंधरा राजेंनी चांगले काम केले असून केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे मागील साडेचार वर्षांतील काम मोठे आहे.त्यांच्या कामाचा करिष्मा राजस्थानमध्ये घडणार असून पुन्हा राजस्थानात भाजपला बहुमत मिळेल. त्यासाठी राजस्थानातील दलितांनी भाजप उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन रामदास आठवलेंनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंबाजोगाईतील डीवायएसपींची बदली, तर ग्रामीणचे पीआय सस्पेंड; उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

Aprna

२१ मे ला विधान परिषदेच्या ६ जागांसाठी होणार निवडणूक

News Desk

गोवा भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Gauri Tilekar