HW News Marathi
राजकारण

मध्य प्रदेशात संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ७४ टक्के मतदान

नवी दिल्ली | मध्य प्रदेश आणि मिझोरम या दोन राज्यांमध्ये आज (२८ नोव्हेंबर) विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरु आहे. संध्याकाळी ६ वाजता ७४.६१ % मतदानाची नोंद झाली असून मतदान अद्याप सुरु आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, आज मध्य प्रदेश व मिझोराम या राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरु असताना काँग्रेस नेत्यांकडून राज्यात जवळपास ७० हूनही अधिक ठिकाणच्या ईव्हीएम मशिन्समध्ये बिघाड झाल्याची शंका उपस्थित केली होती. राज्यात ७० पेक्षाही जास्त ठिकाणच्या ईव्हीएम मशीन्समध्ये बिघाड झाला असल्याची तक्रार करण्यात आली असून या मशीन्स तात्काळ बदलण्यात आल्याचे राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मध्य प्रदेशसह राजस्थानमध्ये मायावती ‘किंगमेकर’

News Desk

उद्या राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक

News Desk

कर्नलसह चार जवान शहीद, शिवसेनेची सरकारवर टीका

News Desk
व्हिडीओ

दुष्काळाच्या प्रश्नावरुन धनंजय मुंडे विधानपरिषदेत आक्रमक

Atul Chavan

विधानपरिषद अधिवेशनातील आजचा दिवस अतिशय गोंधळाचा ठरला. एकीकडे मराठा आरक्षणाचा एक्शन टेकन रिपोर्ट आजच सभागृहात मांडण्यावरुन विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दुष्काळाच्या मुद्दयावरुन सरकारवर निशाणा साधलाय. कधी कोरडा दुष्काळ कधी नोटाबंदी तर कधी बोन्डअळीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याची व्यथा मांडली आहे. पाहुया काय म्हणाले धनंजय मुंडे.

Related posts

फडणवीसांनी जिंकली मनं ! एका निर्णयामुळे सगळीकडे होतंय कौतुक

News Desk

BEST Strike।जाणून घ्या…काय घडले आज न्यायालयात

News Desk

Loksabha Elections-2019 | जाणून घ्या ‘आचारसंहिता’ म्हणजे काय ?

News Desk