HW News Marathi
राजकारण

मोदी सरकारची कामगिरी आता पुस्तकात

मुंबई | मोदी सरकार जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कोणती शक्कल लढवेल हे सांगता येत नाही. सोशल मीडिया, पोस्टरबाजी, भाषणातून आपण केलेली काम जनतेपर्यंत पोहोचवत होती. परंतु आता मोदी सरकार केलेली काम पुस्तक रूपात आणणार आहेत. मेकिंग ऑफ न्यू इंडिया’ असे या पुस्तकाचे नाव असून मोदी सरकार या पुस्तकात आपल्या कामाचा लेखाजोगा मांडणार आहे. या पुस्तकाचे आज (मंगळवारी) केंद्रीय मंत्री अरूण जेटली राष्ट्रपती भवनामध्ये रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत प्रकाशन करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीला सहा महिन्याचा कालावधी बाकी असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ पासून साडेचार वर्षात केलेल्या कामाचा हिशोब देणार आहेत. ‘मेकिंग ऑफ न्यू इंडिया’ या पुस्तकाला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रिसर्च फाउंडेशन (SPMRF) आणि निती आयोगाच्या सदस्याने मिळून तयार केले आहे. या पुस्तकाला अंतिम स्वरूप देण्यासाठी ५१ दिग्गजांनी आपले योगदान दिले आहे. या पुस्तकाच्या माध्यमांतून आपली प्रतिमा सुधारण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणुकीनंतर ‘चौकीदार’ तुरुंगात जाईल !

News Desk

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर पहिल्या ट्वीटमध्ये बाळासाहेबांची आठवण करत म्हणाले…!

Aprna

‘बोले तैसा चाले’ असे झाले नाही तर लोक झोडपून काढतात !

News Desk