HW News Marathi
व्हिडीओ

एकतेसाठी धावले MD चे विद्यार्थी

महर्षी दयानंद कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाकडून रन फॉर युनिटी, रन फॉर फ्लॅगचे आयोजन करण्यात आले होते. संविधान दिवस आणि मुंबईवर झालेल्या २६/११ या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या रनचे आयोजन करण्यात आले होते. या रन फॉर युनिटीमध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. छाया पानसे, शारदा मॅम, खानविलकर मॅम, प्राध्यापक सुशांत भोसले यांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतली होती. रन फॉर युनिटी द्वारे त्यांनी एकता, समानतेचा संदेश दिला. सांप्रदायिक सद्भावना हा या रन फॉर युनिटीचा उद्देश होता. देशात मोठ्या प्रमाणावर जात, धर्म, सांप्रदाय याद्वारे दंगली, समाजात तेढ निर्माण केले जातात परंतु तरुणांना प्रामुख्याने विद्यार्थ्यांना या सर्वांची जाण व्हावी म्हणून ही रन ठेवली होती असे प्राचार्या डॉ. छाया पानसे यांनी सांगितले. भारतात हिंदू, मुसलीम, शीख, ख्रिश्चन एकत्र असले या देशामध्ये तरी न भांडता राहत आहेत हा संदेश सर्वांपर्यत पोहोचवायचा होता म्हणून विद्यार्थ्यांनी हा रन केला. असेही त्यांनी सांगितले. या रनसाठी भोईवाडा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी मोठी मदत केली. भोईवाडा पोलिस स्टेशन ते महर्षी दयानंद महाविद्यालय असा या रन फॉर युनिटीचा मार्ग होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Hinganghat Bandh | हिंगणघाट जळीतकांडाच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांकडून ‘बंद’ची हाक

Gauri Tilekar

“तुम्हाला माझ्याकडून कोणतं वादग्रस्त वक्तव्य हवंय? सांगा ना”; Kashmir Files वर बोलताना Nana Patekar यांचा संताप

News Desk

महाविकासआघाडी सरकार ५ वर्ष पुर्ण करणारचं!

News Desk