HW News Marathi
राजकारण

केजरीवाल यांच्यावर अज्ञात व्यक्तीने मिरचीपूड फेकली

नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर एका अज्ञात व्यक्तींनी मिरचीपूड फेकली आहे. हा सर्व प्रकार सचिवालायात घडला. केजरीवाल हे सचिवालयात तक्रारी ऐकण्यासाठी गेले असताना हा सर्व प्रकार घडला आहे. यात केजरीवाल यांचा चष्मा तुटला असून सुदैवाने केजरीवाल यांना कोणतीही गंभीर इजा झालेली नाही. परंतु या घटनेनंतर सचिवालायातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

अनिक कुमार असे या व्यक्तीचे नाव असून त्यांनी सचिवालयाच्या पायऱ्याजवळ केजरीवाल यांना थांबविले. यानंतर त्या व्यक्तीने केजरीवाल यांचा चष्मा खेचून त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली. या दोघांच्या झटापटीत केजरीवाल यांचा चष्मा तुटला. या सर्व प्रकारनंतर पोलिसांनी अनिलला ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याचा भाजपकडून निषेध केला आहे. लोकशाहीतील हिंसेला थारा नसल्याचे भाजप नेते विजेंद्र गुप्ता यांनी म्हटले आहे. सचिवालयासारख्या सुरक्षित ठिकाणी मुख्यमंत्र्यांवर यावर प्रश्न उपस्थित केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचा पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ला उद्धवस्त करुन पवारांचे राजकारण संपविणार !

News Desk

भाजपचे नाराज खासदार उदित राज यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

News Desk

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

News Desk