HW News Marathi
राजकारण

विधानभवनावर पोहचण्याआधीच ओला-उबर चालकांना पोलिसांनी रोखले

मुंबई | विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला आज (१९ नोव्हेंबर)ला सुरुवात झाली आहे. ओला-उबर चालक आपल्या मागण्यांसाठी विधानभवनावर धडक देणार होते. परंतु ओला-उबर चालक विधानभवनावर पोहचण्याआधीच भारतमाता सिनेमागृहाजवळ पोलिसांनी त्यांना रोखले. चालक त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी करी रोडच्या भारतमाता चौकापासून ते विधानभवनापर्यंत मोर्च्या काढण्यासाठी मोठ्या संख्येने हजर झाले होते.

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कर्मचारी संघाकडून ओला-उबर चालक मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. शनिवारी रात्रीपासून अनेक ओला-उबर चालक संपावर गेले आहे. या चालक प्रतिकिमी प्रतिकिमी भाडे १८ रुपयांवरून २३ रुपये करण्यात यावे, कमीतकमी अंतरांसाठी नीच्चतम भाडे १५० रुपयांवरून १८० रुपये करण्यात यावे अशा मागण्यांसाठी ओला-उबर कर्मचारी संपावर गेले आहेत.

कल्याण,ठाणे,नवी मुंबईतील अनेक चालकही या मोर्च्यात आज सहभागी होण्यासाठी भारतमाता चौकात जमले होते. हजारोंच्या संख्येने ओला चालक मोर्चा काढणार असल्यामुळे वाहतूक कोंडी होईल अशी भीती वर्तवण्यात येत होती. त्यामुळे मुंबईत सुरक्षच्या दृष्टीने हा मोर्चा सुरू होण्याआधीच तो पोलिसांनी अडवला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पुढचे २४ तास महत्त्वाचे आहेत, सतर्क आणि सावध राहा !

News Desk

‘आयुष्यमान भारत’ योजना म्हणजे मोदी सरकारचा अजून एक ‘जुमला’ – सचिन सावंत

News Desk

आगामी निवडणुकीत स्त्री हट्ट फडणवीसांना भोवणार का ?

News Desk
राजकारण

भाजपची शिवसेनेला ‘उपसभापती’ ची ऑफर

News Desk

नवी दिल्ली | भाजप आणि शिवसेना यांच्यातील मतभेद सर्वांना माहिती आहेत. पण, आपल्या मित्रपक्षाला आगामी निवडणुकी आधी खुश करण्यासाठी भाजप आतापासून सुरुवात केली आहे. राज्यसभेचे उपसभापतीपद शिवसेनेला देण्याबाबत चर्चा सुरु आहे. शिवसेनेला भाजपच्या वतीने अशी ऑफर देण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे.

काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रोफेसर पी जे कुरियन यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्याने लवकरच नव्या उपसभापतींची निवड होणार आहे. भाजप हे पद विरोधकांना देण्यासाठी तयार नाही. हे पद मित्र पक्षाला देण्यासाठी भाजप धडपड करत आहे.

भाजपने शिवसेनेला दिलेली ही ऑफर स्वीकारण्याचा अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सोपवण्यात आला आहे. संजय राऊत, अनिल देसाई आणि राजकुमार धूत सध्या राज्यसभेत शिवसेनेचे तीन सदस्य खासदार आहेत.

Related posts

मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या मल्टी मॉडेल टर्मिनलचे उद्घाटन

News Desk

एअर स्ट्राईक प्रकरणी पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका

News Desk

#LokSabhaElections2019 : भाजपमधून बाहेर पडणे वेदनादायी !

News Desk