HW News Marathi
देश / विदेश

छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांकडून आयईडी स्‍फोट, ६ जण जखमी

रायपूर | छत्तीसगढमधील विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर पुन्हा एकदा नक्षलवादी हल्ला झाला. हा हल्ला बिजापूरपासून ७ किलोमीटर अंतरावर निक्षलवाद्यांनी आयईडी स्‍फोट घडवून आला आहे. या हल्ल्यात बीएसएफचे ४ जवान, स्थानिक पोलीस दलातील एक आणि एक सामान्य नागरिक या हल्ल्यात जखमी झाले आहेत. दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नरेश सिंह, भगवान सिंह, निरंजन सिंह, आलोक सिंह, गणपती वसन यांच्यासह एक सिव्हिल ड्राइवर या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहे.

नक्षलविरोधी अभियानाचे डीआयजी पी. सुंदरराज यांनीही हल्‍ला झाल्याची माहिती दिली. सुंदरराज यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ९ वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला असून बीएसएफने संपूर्ण परिसराला घेराव घालून येथील रहदारी बंद करण्यात आला आहे. छत्तीसगढमध्ये पहिल्या टप्प्यात १० विधानसभा मतदारसंघांमध्ये ११ नोव्हेंबरला मतदान झाले असून या एकूण ७० टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी १२ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान होणार आहे

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कोरोना’बाधिताच्या संपर्कात आल्याने औरंगाबादमधील तब्बल २० जणांना क्वारंटाईन

News Desk

त्रिपुरामध्ये सत्ता येताच भाजपचा उपद्रव सुरू

News Desk

दहशतवाद्यांना जिवंत राहू दिले जाणार नाही

News Desk