HW News Marathi
राजकारण

Chhattisgarh Assembly Elections 2018 : ७० टक्के जनतेने केले मतदान

रायपूर | छत्तीसगढमध्ये पहिल्या टप्प्यात १० विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान संपले आहे. मतदानाला सकाळी ८ वाजल्यापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ७० टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. तर छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी १२ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये संध्याकाळी ४.३० पर्यंत ५६.५८ टक्के मतदान झाले होते.

छत्तीसगड काही ठिकाणी नक्षलवाद्यांनी १२ गावांतील नागरिकांना घरातच कोंडून ठेवले होते. यामुळे या गावांमध्ये मतदान होऊ शकले नाही. तर काही ठिकाणी झोपड्या, तंबू उभारून मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. तसेच एका ठिकाणी नक्षलवाद्यांनी स्फोटही घडवून आणला. तरी काही ठिकाणी मतदान केंद्रत गेलेल्या बहुतांश लोकांचे नावे मतदार यादीतून गहाळ झाले. त्यामुळे लोकांनी मतदान केंद्र बाहेर येऊन गोंधळ घातला. हा सर्व प्रकार जगदलपूरच्या गांधी नगरमधील अनेकांची नावे मतदारयादीतून गायब लोकांनी संताप व्यक्त केला आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान फक्त १ टक्के ईव्हीएम मशिन आणि १.९ टक्के व्हीव्हीपॅट मशीन नादुरुस्त झाल्याने तात्काळ बदलण्यात आल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकारणातील पवारांविषयीची भीती संपली !

News Desk

पुण्यातील चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजप 40 स्टार प्रचाराकांची यादी जाहीर

Aprna

हल्लाबोलच्या प्रतिसादानंतर राष्ट्रवादीची राज्यभर परिवर्तन यात्रा !

News Desk